नवी दिल्ली : फाफ डू प्लेसिसच्या झंझावाती शतकामुळे जोहान्सबर्ग सुपर किंग्जने शानदार विजय मिळवला. गेराल्ड कोएत्झी आणि महेश थेक्षाना यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे जोहान्सबर्ग सुपर किंग्जला वांडरर्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या SAT20 2023 च्या सामन्यात मोठी मदत झाली. फाफ डू प्लेसिसच्या संघाने डर्बन सुपर जायंट्सचा 8 गडी राखून पराभव केला. सुपर जायंट्सच्या 178 धावांना प्रत्युत्तर देताना सुपर किंग्जने 5 चेंडू राखून आणि 2 गडी गमावून विजय मिळवला.
फाफ डू प्लेसिसचे झंझावाती शतक
178 धावांच्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि रीझा हेंड्रिक्स यांनी मिळून सुपर किंग्ज संघासाठी 16.3 षटकांत पहिल्या बळीसाठी 157 धावांची भागीदारी केली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. हेंड्रिक्सने 46 चेंडूत 45 धावा केल्या. त्याच वेळी, डु प्लेसिसने 58 चेंडूंत नाबाद 113 धावा केल्या, ज्यात त्याने आठ चौकार आणि आठ षटकार ठोकले. त्याने 16 चेंडूत केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने आपल्या डावातील 80 धावा केल्या. लक्षणीय बाब म्हणजे या स्पर्धेत शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. तर सुपर जायंट्सकडून रीस टोपले आणि विआन मुल्डर यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
गेराल्ड कोएत्झी आणि महेश थेक्षाना यांनी केली कमाल
तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डर्बन सुपर जायंट्सच्या संघाने 6 बाद 178 एवढ्या धावा केल्या. हेन्रिक क्लासेनने 48 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 65 धावा केल्या. याशिवाय काईल मेयर्स (28), मॅथ्यू ब्रेट्झके (28) आणि जेसन होल्डरने 12 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. तर सुपर किंग्जकडून गेराल्ड कोएत्झी आणि महिष टेकशाना यांनी प्रत्येकी 3-3 बळी घेतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Johannesburg Super Kings beat Durban Super Giants by 8 wickets thanks to captain Faf du Plessis' century
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.