डुबलीन, वेस्ट इंडिज वि. आयर्लंड : वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीला लागलेल्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी रविवारी विक्रमाला गवसणी घातली. बांगलादेश, आयर्लंड आणि वेस्ट इंडिज या वन डे तिरंगी मालिकेतील पहिल्याच सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी ऐतिहासिक कामगिरी केली. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शाय होप आणि जॉन कॅम्बेल या विंडीजच्या सलामीवीरांनी पराक्रमी खेळी केली. या दोघांनी पाकिस्तानच्या नावावर असलेला विक्रमही मोडला.
आयर्लंडने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात शाय होप आणि जॉन कॅम्बेल या विंडीजच्या सलामीवीरांनी वैयक्तिक शतक ठोकले. होप्स आणि कॅम्बेल यांनी आयर्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या इतिहासात एका डावात सलामीवीरांनी शतक ठोकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. होप्सचे हे वन डेतील पाचवे शतक ठरले, तर कॅम्बेलने कारकिर्दीतील पहिल्याच शतकाची नोंद केली. त्याने 99 चेंडूंत शतक ठोकले. यासह त्यांनी पहिल्या विकेटसाठी 250+ धावांची भागीदारी केली. त्यांनी 1997साली चंद्रपॉल व विलियम्स यांच्या 200 धावांचा ( वि. भारत) विक्रम मोडला.
या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 307 धावांचा पल्ला पार करताच इतिहास घडवला. आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या विकेटसाठी केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. या जोडीनं पाकिस्तानच्या इमान उल हक व फाखर जमान यांचा 304 धावांचा विक्रम मोडला. या दोघांनी 2018 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता.
Web Title: John Campbell and Shai Hope record for the highest ODI opening partnership of all time
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.