मुंबई - भारतीय खेळाडू इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी कसून सरावाला लागले आहेत. सरावातही हे खेळाडू मस्करी करून एकमेकांना चिअर करताना पाहायला मिळत आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. 1 ऑगस्टपासून सुरू होणा-या कसोटी मालिकेसाठीच्या भारतीय संघात यष्टीरक्षक ऋषभ पंतलाही स्थान देण्यात आले आहे.
वृद्धिमान साहा दुखापतीमुळे या मालिकेला मुकला आहे आणि त्याच्याजागी दिनेश कार्तिकला संधी मिळाली आहे. राखीव यष्टीरक्षक म्हणून पंत संघात असणार आहे. आयपीएल स्पर्धेतील कामगिरीमुळे त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले आहे. इंग्लंडविरूद्धच्या मालिकेपूर्वी पंत भारताच्या A संघासोबत इंग्लंड लायन्सविरूद्ध खेळला होता. या सामन्यासाठीच्या सराव सत्रात पंतने बॅकफ्लिप आणि फ्रंट फ्लिप लगावत असलेला व्हिडीओ इंस्टावर टाकला. त्याला हार्दिक पांड्या आणि सुरेश रैना यांनी लाईक केले, तर युझवेंद्र चहलने पंतची खिल्ली उडवली. तो म्हणाला, तुझा व्हिडीओ पाहिल्यानंतर अपोलो सर्कशीतून ऑफर आलेली आहे. त्यांना हा बोलू का?
इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेतून रोहित शर्माला वगळण्यात आले आहे. करूण नायरला कुलदीप यादवसह संघात स्थान देण्यात आले आहे. रवींद्र जडेजा आणि आर अश्विन फिरकीची जबाबदारी सांभाळणार आहेत.
Web Title: jokes Chahal, Pant's stunts perfect for 'Circus'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.