ICC Awards Jomel Warrican Beats Varun Chakravarthy : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं मंगळवारी नव्या वर्षातील 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा केली. भारताचा वरुण चक्रवर्तीला मागे टाकत वेस्ट इंडिज्या अष्टपैलून जोमेल वारिकेन याने जानेवारी महिन्यातील पुरस्कार पटकवला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिघांमध्ये होती 'काँटे की टक्कर'
आयसीसीकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला प्रत्येक महिन्यात खास पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जानेवारीतील सर्वोत्तम कामगिरीच्या आधारावर पुरुष गटातून ३ खेळाडू या पुरस्काराच्या शर्यतीत होते. टीम इंडियाचा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती, पाकिस्तानचा फिरकीपटू नोमान अली यांच्यासह वेस्टइंडिजच्या जोमेल वारिकेन या तिघांमध्ये 'कांटे की टक्कर' होती. अखेर कॅरेबियन ऑलराउंडरनं या शर्यतीत बाजी मारली.
पाकिस्तान विरुद्ध सर्वोच्च कामगिगिरी
जोमेल वारिकेन याच्या दमदार कामगिरीच्या जोरावर वेस्ट इंडिजच्या संघानं पाकिस्तानमध्ये ३५ वर्षांनी कसोटी जिंकत इतिहास रचला होता. पाकिस्तान विरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जोमेल याने १९ विकेट्स घेतल्या होत्या. दुसऱ्या कसोटी सामन्यात ३६ धावांच्या खेळीसह ५ विकेट्स घेत त्याने वेस्ट इंडिजच्या ऐतिहासिक विजयात सिंहाचा वाटा उचलला होता.
पाच विकेट्स मिळवणं एवढं अविस्मरणीय ठरेल, याची कल्पनाही केली नव्हती
कॅरेबियन स्टार पुरस्कार जिंकल्यावर म्हणाला की, हा पुरस्कार मिळणं ही सन्मानजनक गोष्ट आहे. यावर्षी माझं लक्ष्य कसोटी क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेण्यावर होते. पण ही कामगिरी एवढी अवस्मरणीय ठरेल, याचा विचारही केला नव्हता. हा कारकिर्दीतील एक छोटा टप्पा असून पुढे आणखी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे, असे मत त्याने मांडले.
महिला गटात बेथ मूनीनं मारली बाजी
आयसीसी 'वुमन्स प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्काराच्या यादीत बेथ मूनी सर्वात भारी ठरली. तिने जानेवारीमध्ये इंग्लंड विरुद्धच्या ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत दमदार कामगिरी करून दाखवली होती. या मालिकेत तिने १०६.५० च्या सरासरीनं २१३ धावा केल्या होत्या. हा पुरस्कार जिंकणं ही सन्मानाची बाब आहे. यासाठी पुरस्कारासाठी निवड करण्यात मोलाचा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या क्रिकेट चाहत्यांचेही तिने आभार मानले आहेत.