Jonny Bairstow Yuzvendra Chahal, IPL 2022 PBKS vs RR Live : जॉनी बेअरस्टोचं खणखणीत अर्धशतक, जितेशची फटकेबाजी; राजस्थानपुढे १९० धावांचं आव्हान

युजवेंद्र चहलने घेतले ३ बळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2022 06:14 PM2022-05-07T18:14:11+5:302022-05-07T18:15:04+5:30

whatsapp join usJoin us
Jonny Bairstow Fabulous Fifty takes Punjab Kings to big score Yuzvendra Chahal takes 3 wickets Rajasthan Royals need 190 runs to win | Jonny Bairstow Yuzvendra Chahal, IPL 2022 PBKS vs RR Live : जॉनी बेअरस्टोचं खणखणीत अर्धशतक, जितेशची फटकेबाजी; राजस्थानपुढे १९० धावांचं आव्हान

Jonny Bairstow Yuzvendra Chahal, IPL 2022 PBKS vs RR Live : जॉनी बेअरस्टोचं खणखणीत अर्धशतक, जितेशची फटकेबाजी; राजस्थानपुढे १९० धावांचं आव्हान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Jonny Bairstow Yuzvendra Chahal, IPL 2022 PBKS vs RR Live : जॉनी बेअरस्टोचे दमदार अर्धशतक आणि जितेष शर्मा-लियम लिव्हिंगस्टोन जोडीचा फिनिशिंग टच याच्या बळावर पंजाबने २० षटकांत ५ गड्यांच्या मोबदल्यात १८९ धावा केल्या. गेल्या काही सामन्यांत फॉर्मशी झगडणाऱ्या जॉनी बेअरस्टोने ४० चेंडूत ५६ धावांची खेळी केली आणि राजस्थानच्या संघाला १९० धावांचे आव्हान दिले. युजवेंद्र चहलने ४ षटकांत २८ धावा देत ३ बळी टिपले.

टॉस जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेअरस्टो आणि शिखर धवन यांनी चांगली सुरूवात केली. राजपक्षेने २ चौकार व २ षटकार खेचत २७ धावा केल्या. तर मयंक अग्रवाल १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर जितेश शर्माने नाबाद राहत १८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३८ धावा कुटल्या. लिव्हिंगस्टोननेदेखील १४ चेंडूत २२ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली.

राजस्थानच्या गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहलने चांगली कामगिरी केली. त्याने २८ धावा देत ३ बळी घेतले. प्रसिध कृष्ण आणि कुलदीप सेन यांची गोलंदाजी महागात पडली. त्याने अनुक्रमे ४८ धावांत २ आणि ४२ धावांत दोन बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने ३६ धावांमध्ये १ बळी टिपला.

Web Title: Jonny Bairstow Fabulous Fifty takes Punjab Kings to big score Yuzvendra Chahal takes 3 wickets Rajasthan Royals need 190 runs to win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.