ब्रिस्टल : इंग्लंडच्या संघाचा घातक फंलदाज जॉनी बेयरस्टोला आपल्या संघातील खेळाडू सॅम करनला उचलणं महागात पडले आहे. या बाहुबली शैलीमुळे त्याला दुखापत झाली असून दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात तो खेळणार का याबाबत संभ्रम आहे. बेयरस्टोला सराव सत्रातून अचानक बाहेर व्हावे लागले आहे, त्याच्या डाव्या गुडघ्यावर बॅंडेज बांधले होते. त्याला चालताना देखील त्रास जाणवत होता, मात्र आफ्रिकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात खेळणार की नाही याबाबत त्याने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये बुधवारपासून टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. दुसरा सामना देखील गुरूवारी खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत बेयरस्टो इंग्लिश संघातून बाहेर होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास सॉल्ट आणि हॅरी ब्रूक इंग्लंडच्या संघाची मधली फळी सांभाळू शकतात. भारताविरूद्ध बेयरस्टोला विश्रांती देण्यात आली होती तेव्हा हे दोन्ही खेळाडू इंग्लिश संघाचा भाग होते.
बेयरस्टोला बाहुबली बनणं पडलं महागातइंग्लिश संघाचा फलंदाज जॉनी बेयरस्टोला दुखापत झाली असल्याचे अद्याप निश्चित नाही. मात्र इंग्लंडच्या संघातील खेळाडू रिस टॉपलीने इंस्टाग्रामवर स्टोरी ठेवली आहे, ज्यामध्ये बेयरस्टोला दुखापत झाल्याचे दिसत आहे. जिममध्ये वर्कआउट करताना बेयरस्टोने सॅम करणला उचलले होते.
१७ ऑगस्ट पासून कसोटी मालिकेचा थरारइंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १७ ऑगस्टपासून कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. दोन्ही देशांमध्ये १७ ऑगस्ट पासून लॉर्ड्स कसोटीपासून मालिकेची सुरूवात होईल. मात्र यादरम्यान द हंड्रेड टूर्नामेंट देखील सुरू होणार आहे, ज्यामध्ये खेळण्यासाठी बेयरस्टो आणि काही इंग्लिश खेळाडू उपलब्ध असणार आहेत. बेयरस्टोने वेल्श फायर संघासोबत करार केला आहे.