जाँटी ऱ्होड्सला दिसला अपघातग्रस्त मॅथ्यू हेडनच्या डोक्यावर तामिळनाडूचा नकाशा

प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन याला अपघात झाला आहे. क्विन्सलँड्स येथील एका बीचवर मुलासह सर्फिंग करताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हा अपघात घडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 08:44 AM2018-10-09T08:44:47+5:302018-10-09T08:45:05+5:30

whatsapp join usJoin us
Jonty Rhodes Finds 'The Map Of Tamil Nadu' On Matthew Hayden's Head Injury | जाँटी ऱ्होड्सला दिसला अपघातग्रस्त मॅथ्यू हेडनच्या डोक्यावर तामिळनाडूचा नकाशा

जाँटी ऱ्होड्सला दिसला अपघातग्रस्त मॅथ्यू हेडनच्या डोक्यावर तामिळनाडूचा नकाशा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरवणारा ऑस्ट्रेलियाचा माजी स्फोटक फलंदाज मॅथ्यू हेडन याला अपघात झाला आहे. क्विन्सलँड्स येथील एका बीचवर मुलासह सर्फिंग करताना अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे हा अपघात घडला. यामुळे त्याच्या पाठीच्या कण्याला आणि गळ्याला दुखापत झाली आहे. पण आपल्या प्राकृतिक सुधारणा होत असल्याचे हेडनने सोशल मीडियावरून सांगितले. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जाँटी ऱ्होड्सने मात्र त्याच्या इंस्टाग्रामवरील फोटोवर विनोदी प्रतिक्रिया दिली. 

View this post on Instagram

ऱ्होड्स आणि त्याचे भारत प्रेम हे जगजाहीर आहे. त्याने त्याच्या मुलीचे नावही इंडिया असे ठेवले आहे. हेडनच्या दुखापतीतही त्याचे हे प्रेम दिसले. अपघातामुळे हेडनच्या कपाळावर व्रण राहिले आहे आणि त्यात ऱ्होड्सने तामिळनाडूचा नकाशा शोधून काढला आहे. हेडनच्या पोस्टवर त्याने तशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लिहिले की," तामिळनाडूच्या समुद्र किनाऱ्याच्या नकाशा असलेली टोपी तु घातली आहेस का? तुझ्यासारख्या हळव्या माणसाने सोपा मार्ग निवडला असता आणि एक टॅटू काढला असता." 

View this post on Instagram


'‘अपघातानंतर मला साहाय्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. बेन आणि स्यू यांचे विशेष आभार. त्यांनी प्राथमिक उपचार करून मला कमी वेळेत रुग्णालयात दाखल केले. आता प्रकृतीत सुधारणा होत आहे,’ असे हेडनने इन्स्टाग्रामवर लिहिले होते. 

हेडनचा असा अपघात होण्याची ही दुसरी वेळ आहे.  यापूर्वी २०००मध्ये मासेमारी करताना त्याची बोट बुडू लागली आणि त्याला काही किलोमीटर पोहावे लागले. त्या वेळी त्याच्यासोबत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्य्रू सायमंड्सही होता. हेडनने १०३ कसोटी, १६१ एकदिवसीय आणि ९ टी२० सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले आहे. 
 

Web Title: Jonty Rhodes Finds 'The Map Of Tamil Nadu' On Matthew Hayden's Head Injury

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.