इंग्लंड संघाचा वनडे आणि टी २० संघाचा कॅप्टन जोस बटलर याने वेस्टइंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतून दमदार कमबॅक केले आहे.
जून २०२४ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. ९ नोव्हेंबरला वेस्टइंडिज विरुद्धच्या टी-२० मालिकेतून त्याने पदार्पण केले. या कमबॅक सामन्यात त्याला खातेही उघडता आला नव्हते. पण दुसऱ्या सामन्यात त्याने याची कसर भरून काढली. दुसऱ्या टी-२० सामन्यात जोस बटरलनं ४५ चेंडूत ८३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
बटलरचा गगनचुंबी फटका; मारला वर्षातील सर्वात लांब सिक्सर
जोस बटलरच्या स्फोटक खेळीत ८ चौकरांसह ६ गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. यातील एक सिक्सर मारताना बटलरनं चेंडू ११५ मीटर लांब अंतरावर जाऊन पडला. गुडाकेश मोती (Gudakesh Motie) याच्या गोलंदाजीवर त्याने मारलेला उत्तुंग षटकार सध्या चांगलाच चर्चेत आहे. कारण या वर्षातील हा सर्वात लांब सिक्सरही ठरलाय.
IPL मेगा लिलावात भाव वाढवणारी खेळी
इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) च्या आगामी हंगामाआधी त्याच्या भात्यातून निघलेली खेळी त्याला मालामाल करण्यास फायदेशीर ठरू शकते. आयपीएल स्पर्धेत बटलर हा राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यातून खेळताना पाहायला मिळाले होते. मेगा लिलावाआधी राजस्थानच्या संघाने त्याला रिलीज केले. त्यामुळे मेगा लिलावात अनेक फ्रँचायझींच्या नजरा आता त्याच्यावर असतील. वेस्ट विरुद्धच्या टी सामन्यातील स्फोटक खेळीमुळे त्याचा भाव आणखी वाढेल. लांब पल्ल्याचा सिक्सरनंतर या इंग्लंडच्या खेळाडूसाठी मोठी किंमत मोजून कोणताही फ्रँचायझी संघ सहज हिमंत दाखवेल.
इंग्लंडच्या संघाने मालिकेत घेतलीये २-० अशी आघाडी
इंग्लंडच्या संघाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजच्या संघाला ८ गडी राखून पराभूत केले होते. दुसऱ्या सामन्यात पुन्हा कॅरेबियन संघ हतबल ठरला. इंग्लंडच्या संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. कॅरेबियन संघाला मालिका विजय मिळवायचा असेल तर उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागणार आहे. दुसरीकडे इंग्लंडला फक्त एक सामना जिकूंन मालिकेवर कब्जा करता येईल. या मालिकेतील तिसरा सामना १४ नोव्हेंबरला रंगणार आहे.
Web Title: Jos Buttler Hits 115 Meter Long Six Which Team Will Buy Him In IPL Mega Auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.