Jos Buttler, IPL 2022 MI vs RR Live: मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या तीन षटकात मुंबईच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवला होता. जसप्रीत बुमराह पहिल्या दोन षटकात ९ धावा देत १ बळी घेतला होता तर डॅनियल सॅम्सने ८ धावांचे एक षटक टाकले होते. पण चौथ्या षटकात जोस बटलरने राजस्थानच्या संघाला बुस्टर डोस दिला आणि बेसिल थंपीच्या (Basil Thampi) गोलंदाजीतील हवाच काढून टाकली.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चांगली सुरूवात केली होती. जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात सलामीवीर यशस्वी जैस्वालला बाद केलं होते. त्यामुळे ३ षटकांअखेरीस राजस्थानची धावसंख्या केवळ १ बाद १७ होती. पण त्यानंतर पुढच्याच षटकात बेसिल थंपीने गोलंदाजीला सुरूवात केली. पहिल्या चेंडू त्याने निर्धाव टाकला. पण त्याच्या पुढच्या पाचही चेंडूंवर त्याला मोठा फटका बसला. जोस बटलरने त्याच्या षटकात ४, ६, ६, ४, ६ अशा तब्बल २६ धावा लुटल्या.
मुंबई इंडियन्सचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (किपर), अनमोलप्रीत सिंग, टिळक वर्मा, किरॉन पोलार्ड, टीम डेव्हिड, डॅनियल सॅम्स, मुरुगन अश्विन, जसप्रीत बुमराह, टायमल मिल्स, बेसिल थम्पी
राजस्थान रॉयल्सचा संघ: जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार, किपर), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, नवदीप सैनी, प्रसीध कृष्णा