Join us  

Eoin Morgan Trolled ENG vs NED: "अख्खं गाव जेवून गेलं नि हे उपाशी राहिले"; नेटकऱ्यांनी इयॉन मॉर्गनला केलं तुफान ट्रोल

इंग्लंडने वन डे मध्ये ४९८ धावा ठोकून केला वर्ल्ड रेकॉर्ड, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 2:41 PM

Open in App

Eoin Morgan Troll on social media ENG vs NED: इंग्लंडच्या संघाने नेदरलँड्सच्या संघाविरूद्ध वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या उभारली. इंग्लंडकडूनजोस बटलर, डेव्हिड मलान आणि फिल सॉल्ट या तिघांनी दमदार शतकं ठोकली. लियम लिव्हिंगस्टोनने देखील जोरदार फटकेबाजी केली. अखेर नेदरलँड्सच्या संघाला सामन्यात २३२ धावांनी पराभव पत्करावा लागला. या सामन्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गनला नेटकऱ्यांनी तुफान ट्रोल केलं. जाणून घेऊया यामागचं कारण-

इंग्लंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना, सलामीवीर फिल सॉल्टने ९३ चेंडूत १२२ धावा (१४ चौकार आणि ३ षटकार) केल्या. डेव्हिड मलान याने १०९ चेंडूत १२५ धावा (९ चौकार आणि ३ षटकार) केल्या. तर जोस बटलरने ७० चेंडूत नाबाद १६२ धावा (७ चौकार आणि १४ षटकार) केल्या. या सामन्यात लियम लिव्हिंगस्टोनने देखील २२ चेंडूत नाबाद ६६ (६ चौकार आणि ६ षटकार) धावा केल्या. पण कर्णधार इयॉन मॉर्गनला मात्र पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद व्हावे लागले. त्यामुळे त्याला तुफान ट्रोल करण्यात आले. सगळ्यांना भरपूर धावा करता आल्या पण मॉर्गनला एकही धाव करता आली नाही. त्यामुळे, अख्खं गाव जेवून गेलं आणि हा उपाशीच राहिला, अशा आशयाच्या कमेंट करत त्याला ट्रोल करण्यात आले.

--

--

--

दरम्यान, ४९८ धावांच्या ऐतिहासिक आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सच्या संघाने ४९.४ षटकात सर्वबाद २६६ धावा केल्या. स्कॉट एडवर्ड्स याने सर्वाधिक नाबाद ७२ धावांची खेळी केली. त्याने ५६ चेंडूत ही फटकेबाजी केली. त्याच्याशिवाय मॅक्स ओडॉड याने अर्धशतक ठोकलं. त्याने ५५ चेंडूत ५५ धावा केल्या. इंग्लंडकडून गोलंदाजीत मोईन अलीने ५७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. डेव्हिड विलीने ४२ धावा देऊन २ बळी तर रीस टॉपलीने ४६ धावा देऊन २ बळी टिपले.

टॅग्स :इंग्लंडजोस बटलरसोशल व्हायरलट्रोल
Open in App