Join us  

कोरोनामुळे IPL 2020 न होणे ही लाजिरवाणी गोष्ट; राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजाची मुक्ताफळं

कोरोना व्हायरसमुळे आयपीएल 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 3:17 PM

Open in App

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) 14 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आयपीएलवरील अनिश्चिततेचं सावट अधिक गडद होत चालले आहेत. पण, अशाची परिस्थितीत राजस्थान रॉयल्स संघाचा फलंदाजनं मुक्ताफळं उधळली आहेत. आयपीएल मोठी स्पर्धा आहे आणि ती न होणे ही लाजीरवाणी गोष्ट असेल, असे मत त्यानं व्यक्त केलं आहे.

... म्हणून ऑसी खेळाडू विराटशी पंगा घ्यायला घाबरतात, मायकेल क्लार्कचा गंभीर आरोप

इंग्लंडचा यष्टिरक्षक-फलंदाज जो बटलरने म्हटलं की,''आयपीएल होणार की नाही किंवा पुढे ढकलली जाणार याबाबत मी जास्त काही सांगू शकत नाही. सध्या सर्वत्र अनिश्चितता आहे आणि ही परिस्थिती कधी सुधरेल, याबाबत कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे येणारा काळच ठरवेल की स्पर्धा होईल की नाही.''

या स्पर्धेच महत्त्व सांगताना बटलर म्हणाला,''क्रिकेटपटूंच्या दृष्टीनं ही स्पर्धा भव्य आहे. त्यामुळे ती वेळापत्रकानुसार न झाल्यास यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट दुसरी असणार नाही.  आयपीएलमधून मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.''  

जोस बटलरनं कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी वर्ल्ड कप विजेत्या संघाची त्याची जर्सी लिलावात ठेवली आहे. आयपीएल वर्षाअखेरीस घेण्याबाबत चर्चा सुरू आहे, परंतु तसे झाल्यास परदेशी खेळाडूंचा सहभाग घटेल. प्रत्येक जण आपापल्या राष्ट्रीय कर्तव्यावर असतील. ''ही स्पर्धा नंतर खेळवल्यास पदरेशी खेळाडूंच्या सहभागावर बंधन येतील. त्यामुळे परिस्थितीनुसार त्यांना निर्णय घ्यायला हवा.'' 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊनमध्ये दिग्गज खेळाडूची 'Sex Party'; कॉलगर्ल्सना बोलावलं घरी!

Sad : दिग्गज फुटबॉल प्रशिक्षकाच्या आईचे Corona मुळे निधन

हिंदू खेळाडूच्या विनंतीचा राखला मान.... शाहिद आफ्रिदीकडून पाकमधील हिंदूंना मदत

उपाशी पोटी झोपी नका, मला मेसेज करा; बेशिस्त अन् बेलगाम म्हणून कुप्रसिद्ध खेळाडूची दिलदारी

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआयपीएल 2020राजस्थान रॉयल्स