Join us  

Jos Buttler, IPL 2022 RR vs KKR: राजस्थानचा 'जोश'.. खूपच हाय! आधी Mumbai Indians अन् आता कोलकाता... जोस बटलरने ठोकलं हंगामातील दुसरं शतक!

मुंबई इंडियन्सविरूद्ध ठोकलं होतं पहिलं शतक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 9:10 PM

Open in App

Jos Buttler Shimron Hetmyer, IPL 2022 RR vs KKR Live Updates: राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) सलामीवीर जोस बटलरच्या शतकाच्या बळावर कोलकाता विरूद्धच्या सामन्यात २० षटकांत ५ बाद २१७ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. KKR चा हा निर्णय राजस्थानच्या फलंदाजांनी पलटवून टाकला. जोस बटलरने १०३ धावांनी दमदार खेळी केली. तर देवदत्त पडिकल, संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर यांनीही मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भर घातली.

--

राजस्थानच्या डावाला देवदत्त पडिकल आणि तुफान फॉर्मात असलेल्या सलामीवीर जोस बटलरने सुरूवात केली. पडिकल २४ धावांवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर बटलरने कर्णधार संजू सॅमसनच्या साथीने चांगली कामगिरी केली. सॅमसन १९ चेंडूत ३८ धावांची खेळी करून बाद झाला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले. बटलरने आधी देवदत्त पडीकलच्या आणि नंतर कर्णधार संजू सॅमसनच्या साथीने शानदार खेळी केली. त्याने ५९ चेंडूत शतक ठोकले. ६१ चेंडूत १०३ धावांची खेळी करून तो बाद झाला. जोस बटलरने तुफान फटकेबाजी करत ९ चौकार आणि ५ षटकारांनी आपली खेळी सजवली. तो बाद झाल्यानंतर शिमरॉन हेटमायरने शेवटच्या टप्प्यात तुफानी खेळी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. त्याने १३ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २६ धावा केल्या.

कोलकाताने आपल्या संघात महत्त्वाचा बदल करत शिवम मावीला अमन खानच्या जागी संघात स्थान दिले. तर राजस्थानने ट्रेंट बोल्ट, ओबेड मॅकॉय आणि करूण नायरला संघात समाविष्ट केले. जेम्स नीशम, रॅसी वॅन डर डुसेन आणि कुलदीप सेन यांना संघाबाहेर करण्यात आले. पाहा दोन्ही संघ-

राजस्थान रॉयल्स- जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), करुण नायर, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युझवेंद्र चहल, ओबेड मॅकॉय.

कोलकाता नाइट रायडर्स- व्यंकटेश अय्यर, अॅरॉन फिंच, श्रेयस अय्यर (कर्णधार), नितीश राणा, शेल्डन जॅक्सन (विकेटकीपर), आंद्रे रसेल, सुनील नरिन, पॅट कमिन्स, शिवम मावी, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती.

टॅग्स :आयपीएल २०२२जोस बटलरराजस्थान रॉयल्समुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्स
Open in App