Jos Buttler Super Catch of Rajat Patidar Video, IPL 2022: क्वालिफायर-२ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने २० षटकात ८ बाद १५७ धावा करत राजस्थान रॉयल्सला १५८ धावांचे आव्हान दिले. बंगलोरचा युवा फलंदाज रजत पाटीदार याने दमदार अर्धशतक (५८) ठोकत संघाला दीडशेपार मजल मारून दिली. कर्णधार डू प्लेसिस (२५) आणि ग्लेन मॅक्सवेल (२५) बाद झाल्यावर धावगती वाढवण्याची जबाबदारी रजत पाटीदारने उचलली. पण त्यातच तो झेलबाद झाला. जोस बटलरने त्याचा टिपलेला झेल बराच चर्चेत राहिला.
विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस दोघे सलामीला आले. विराटने एक षटकार लगावला पण ७ धावांवर तो बाद झाला. त्यानंतर रजत पाटीदारच्या साथीने डू प्लेसिसने डाव पुढे नेला. डू प्लेसिसची संथ खेळी २७ चेंडूत २५ धावांवर संपुष्टात आली. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि पाटीदारने तुफान फटकेबाजीला सुरूवात केली होती. पण मॅक्सवेलल १३ चेंडूत २४ धावांवर असताना झेलबाद झाला. रजत पाटीदारने गेल्या सामन्याप्रमाणेच या सामन्यातही दमदार खेळी केली. त्याने शानदार अर्धशतक ठोकले. रजत पाटीदारने ४२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. पण त्याचा झेल बटलरने जेव्हा घेतला तेव्हा तो सीमारेषेच्या अगदी जवळ उभा होता. त्याने झेल टिपल्यानंतर तोल सांभाळला आणि अप्रतिम झेल टिपला. पाहा व्हिडीओ-
रजत पाटीदार बाद झाल्यानंतर मात्र RCB चा डाव गडगडला. महिपाल लोमरोर (८), दिनेश कार्तिक (६), वानिंदू हसरंगा (०), हर्षल पटेल (१) दोघे झटपट बाद झाले. शाहबाज अहमदने नाबाद १२ धावा करत संघाला १५० पार मजल मारून दिली. राजस्थानकडून प्रसिध कृष्णाने २२ धावांत ३ तर ओबेड मकॉयने २३ धावांत ३ गडी बाद केले. आर अश्विन आणि ट्रेंट बोल्ट यांना १-१ बळी मिळवता आला. पण पर्पल कॅप होल्डर युजवेंद्र चहलला मात्र एकही विकेट मिळाली नाही.
Web Title: Jos Buttler Superb Catch balancing on Boundary Line to Dismiss Rajat Patidar IPL 2022 RCB vs RR
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.