Jos Buttler Rajasthan Royals, IPL 2022 RR vs RCB: जोस बटलरच्या नाबाद १०६ धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थानने बंगलोरवर ७ गडी राखून विजय मिळवला. रजत पाटीदारच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर RCB ने २० षटकात १५७ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने 'रॉयल' विजय मिळवला. या विजयाचा बॉस ठरला जोस बटलर. बटलरने हंगामातील चौथे शतक ठोकले आणि राजस्थानला तब्बल १४ वर्षांनी IPL च्या फायनलमध्ये पोहोचवले. या आधी २००८ च्या हंगामात राजस्थानचा संघ IPL फायनलमध्ये पोहोचला होता. ती फायनल राजस्थानने जिंकली होती. आता २९ मे रोजी राजस्थानचा संघ फायनलमध्ये गुजरात विरूद्ध खेळणार आहे.
राजस्थान रॉयल्स विरूद्ध विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस दोघे सलामीला आले. विराट ७ धावांवर बाद झाला. त्यानंतर डू प्लेसिसची संथ खेळी २५ धावांवर संपुष्टात आली. ग्लेन मॅक्सवेल आणि रजत पाटीदारने तुफान फटकेबाजीला सुरूवात केली होती. पण मॅक्सवेल २४ धावांवर बाद झाला. रजत पाटीदारने मात्र ४२ चेंडूत ५८ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. तो बाद झाल्यावर RCBचा डाव गडगडला. महिपाल लोमरोर (८), दिनेश कार्तिक (६), वानिंदू हसरंगा (०), हर्षल पटेल (१) दोघे झटपट बाद झाले. शाहबाज अहमदने नाबाद १२ धावा करत संघाला १५० पार मजल मारून दिली.
आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने धडाकेबाज सुरूवात केली. त्याने १३ चेंडूत २१ धावा केल्या. त्यात २ षटकार आणि एक षटकाराचा समावेश होता. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने २१ चेंडूत २ षटकार व एका चौकारासह २३ धावा केल्या. जोस बटलरने मात्र तुफानी खेळी सुरूच ठेवली. देवदत्त पडिक्कलला १२ चेंडूत ९ धावाच करता आल्या. पण बटलरने मात्र एकतर्फी सामना जिंकवून दिला. त्याने आधी २३ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्यानंतर तीच लय कायम राखत दणदणीत शतक ठोकलं. त्याचं हे यंदाच्या हंगामातील चौथं शतक ठोकलं. एकाच हंगामात सर्वाधिक शतक ठोकण्याच्या विराटच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली.
Web Title: Jos Buttler superb century Rajasthan Royals enters into the IPL Final beating RCB to Play against Gujarat Titans IPL 2022 Rr vs RCB
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.