T20 World Cup Semi Final IND vs ENG : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चार संघ निश्चित झाले आणि क्रिकेट चाहत्यांना India vs Pakistan यांच्या फायनलची स्वप्न पडू लागली. नेदरलँड्सच्या मेहरबानीमुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला आणि त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान आहे, तर दुसरीकडे भारताचा मुकाबला इंग्लंडशी होणार आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी पहिल्याच सामन्यात एकमेकांना भिडले आणि विराट कोहलीने अविश्वसनीय खेळी करून शेजाऱ्यांना धुळ चाखवली. त्यामुळे आता पुन्हा एकदा IND vs PAK लढतीचे स्वप्न पडत आहेत. त्यात ही फायनल असेल तर क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच. पण, भारत-पाकिस्तान अशी फायनल होऊ देणार नाही, असे चॅलेंज इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने दिले आहे.
IND vs ENG Semi Final : Rohit Sharma उपांत्य फेरीत खेळणार नाही? काल झालेल्या दुखापतीवर कॅप्टनने दिले अपडेट्स
२००७ च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान फायनल झाली होती आणि त्यानंतर १५ वर्षांनी पुन्हा महामुकाबला पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२ चा पहिला फायनलिस्ट आज ठरेल. पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सामना होणार आहे. त्यानंतर उद्या भारत-इंग्लंड असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना एडिलेड येथे होणार आहे. १३ नोव्हेंबरला मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर फायनल होणार आहे. भारताविरुद्धच्या लढतीपूर्वी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर ( Jos Buttler ) याने भारताचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. इंग्लंडने २०१०मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता.
''आम्हाला भारत-पाकिस्तान फायनल होऊ द्यायची नाही आणि त्यामुळे त्यांची पार्टी खराब करण्याचा आमचा प्रय्तन आहे. भारतीय संघ तुल्यबळ आहे. आमच्या संघातील प्रत्येक खेळाडू उपांत्य फेरीची लढत खेळण्यासाठी उत्सुक आहे. भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली आहे, परंतु त्यांना तोडीसतोड उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत,''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Jos Buttler: We certainly don’t want to see an India Pakistan final. So we’ll be trying all we can do to make sure that doesn’t happen.
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.