Josh Little Hat trick, NZ vs IRE Video: आयर्लंडच्या लिटलने न्यूझीलंडविरूद्ध घेतली 'विश्वविक्रमी' हॅटट्रिक, टी२० वर्ल्डकपमध्ये केला भल्याभल्यांना न जमलेला पराक्रम

यंदाच्या वर्ल्डकपमधील ही दुसरी हॅटट्रिक ठरली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 11:38 AM2022-11-04T11:38:12+5:302022-11-04T11:42:40+5:30

whatsapp join usJoin us
Josh Little hat trick against New Zealand as Ireland bowler registers second hattrick in T20 World Cup history World Record NZ vs IRE watch video | Josh Little Hat trick, NZ vs IRE Video: आयर्लंडच्या लिटलने न्यूझीलंडविरूद्ध घेतली 'विश्वविक्रमी' हॅटट्रिक, टी२० वर्ल्डकपमध्ये केला भल्याभल्यांना न जमलेला पराक्रम

Josh Little Hat trick, NZ vs IRE Video: आयर्लंडच्या लिटलने न्यूझीलंडविरूद्ध घेतली 'विश्वविक्रमी' हॅटट्रिक, टी२० वर्ल्डकपमध्ये केला भल्याभल्यांना न जमलेला पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Josh Little Hat trick, NZ vs IRE Video: न्यूझीलंडच्या संघासमोर तुलनेने कमकुवत वाटणाऱ्या आयर्लंडने टी२० विश्वचषक स्पर्धेत एक अनोखा विश्वविक्रम केला. आयर्लंडच्या गोलंदाजीविरूद्ध न्यूझीलंडने २० षटकात १८५ धावांची खेळी केली. मात्र त्यात आयर्लंडसाठी आनंदाची बातमी म्हणजे, त्यांचा गोलंदाज जोशुआ लिटल याने न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरूद्ध टी२० क्रिकेटमध्ये हॅटट्रिकची नोंद केली. १९वे षटक हे सामन्यातील महत्त्वाचे षटक मानले जाते, त्या षटकात लिटलने हॅटट्रिक घेत मोठा पराक्रम केला.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १८० पार मजल मारली. फिन एलनने १८ चेंडूत ३२ तर डेवॉन कॉनवेने ३३ चेंडूत २८ धावांची खेळी केली. या दोघांनी न्यूझीलंडला दमदार सलामी मिळवून दिली. त्यानंतर केन विल्यमसनही अखेर फॉर्मात परतला. त्याने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या साथीने ६१ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सला मोठी खेळी करता आली नाही. पण शेटच्या टप्प्यात डॅरेल मिचेलच्या ३१ धावांच्या जोरावर न्यूझीलंडने १८५ धावांपर्यंत मजल मारली.

---

आयर्लंडच्या लिटलची विश्वविक्रमी हॅटट्रिक

सामन्याच्या १९व्या षटकात जोशुआ लिटलने गोलंदाजी सुरू केली. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर त्याने केन विल्यमसनला माघारी धाडले. तिसऱ्या चेंडूवर जीमी निशमला बाद केले. तर चौथ्या चेंडूवर मिचेल सँटनरला तंबूत पाठवले. त्याने यंदाच्या टी२० वर्ल्डकपमधील दुसरी तर टी२० वर्ल्डकपच्या इतिहासातील सहावा खेळाडू ठरला. त्याच्या आधी ब्रेट ली, कर्टीस कॅम्फर, कगिसो रबाडा, वानिंदू हसरंगा आणि कार्तिक मयप्पन यांनी हा बहुमान मिळवला होता. Josh Little याच्या हॅटट्रिकने आयर्लंडने असा एक पराक्रम केला जो भल्याभल्या संघाना जमला नाही. आयर्लंडकडून टी२० वर्ल्डकप मध्ये ही दुसरी हॅटट्रिक ठरली. या आधी कर्टिस कॅम्फरने हा कारनामा केला होता. त्यामुळे टी२० वर्ल्डकपमध्ये दोन हॅटट्रिक नोंदवणारा आयर्लंड हा एकमेव संघ ठरला आहे.

Web Title: Josh Little hat trick against New Zealand as Ireland bowler registers second hattrick in T20 World Cup history World Record NZ vs IRE watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.