Join us  

‘पत्रकाराने दिली धमकी’, टीम इंडियातून बाहेर झाल्यावर वृद्धिमान साहाने स्क्रिनशॉट शेअर करत केला गंभीर दावा 

Riddhiman Saha News: भारतीय संघातून वगळल्यानंतर वृद्धिमान साहाने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीवर टीका केली. त्यानंतर आता एक स्क्रिनशॉट शेअर करत रिद्धीमान साहान अजून एक गंभीर दावा केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2022 3:43 PM

Open in App

कोलकाता - श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय  संघातून अनेक ज्येष्ठ खेळाडूंना बाहेरची वाट दाखवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघातील अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यालाही संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर साहाने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीवर टीका केली. त्यानंतर आता एक स्क्रिनशॉट शेअर करत वृद्धिमान साहाने अजून एक गंभीर दावा केला आहे. एका पत्रकाराने आपल्याला मुलाखत देण्यासाठी त्रास दिला असा आरोप रिद्धिमान साहाने केले आहे.

वृद्धिमान साहाने स्क्रिनशॉटचा एक फोटो ट्विटरवर ट्विट केला. त्यात रिद्धिमान साहा आणि एका पत्रकारामधील संवाद दिसत आहे. हा फोटो शेअर करताना वृद्धिमान साहाने लिहिले की, भारतीय क्रिकेटमध्ये माझ्या संपूर्ण योगदानानंतर एका तथाकथित सन्माननीय पत्रकाराकडून या गोष्टीचा सामना करावा लागत आहे. पत्रकारिता कुठे गेली आहे.

शेअर करण्यात आलेल्या स्क्रिनशॉटमध्ये लिहिले की, माझ्यासोबत एक मुलाखतीचा कार्यक्रम कराल का, जर तुम्ही लोकशाहीवादी बनू इच्छित असाल तर मी त्यासाठी तुमच्यावर दबाव आणणार नाही. त्यांनी केवळ एका यष्टीरक्षकाची निवड केली आहे. तू ११ पत्रकार निवडण्याचा प्रयत्न केला. ही बाब माझ्या मते योग्य नाही. त्यांची निवड करा जे तुमची अधिकाधिक मदत करू शकतील. तू कॉल केला नाहीस. मी आता तुझा कधीही इंटरव्यू घेणार नाही आणि ही गोष्ट मी कायम लक्षात घेईन.

दरम्यान भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही वृद्धिमान साहाला पाठिंबा दिला आहे. तो म्हणाला, रिद्धी मी तुझ्यासोबत आहे. या प्रकारान मी दु:खी आहे. ते ना आदराला पात्र आहेत. ना ती पत्रकार आहेत, असा संताप साहाने व्यक्त केला. 

टॅग्स :वृद्धिमान साहाभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयसोशल मीडिया
Open in App