एनएससीआयच्या दोन्ही संघांची कूच

एनएससीआय ‘सिनिअर्स’ आणि एनएससीआय ‘यंगस्टर्स’ या दोन्ही संघांनी आपआपल्या लढतीत शानदार विजय मिळवताना मुंबई स्नूकर लीग स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 03:52 AM2017-08-15T03:52:07+5:302017-08-15T03:52:07+5:30

whatsapp join usJoin us
The journey of both the NSCI teams | एनएससीआयच्या दोन्ही संघांची कूच

एनएससीआयच्या दोन्ही संघांची कूच

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : एनएससीआय ‘सिनिअर्स’ आणि एनएससीआय ‘यंगस्टर्स’ या दोन्ही संघांनी आपआपल्या लढतीत शानदार विजय मिळवताना मुंबई स्नूकर लीग स्पर्धेच्या उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
महाराष्ट्र बिलियडर््स - स्नूकर संघटनेच्या (बीएसएएम) मान्यतेने ओट्टर्स क्लब येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एनएससीआय ‘सिनिअर्स’ संघाने सीसीआय ‘एक्स मेन’ संघाचा ३-० असा धुव्वा उडवला. इश बावाने पहिल्या लढतीत कसलेल्या हसन बदामीचा ९७-६४ असा पराभव करुन एनएससीआयला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर जतिंदर दावर - संजीव बिजलानी यांनी एनएससीआयची आघाडी २-० अशी वाढवताना निखिल ओटम - संदीप गुलराजनी यांचा ६४-६१ असा पराभव केला. सारंग श्रॉफने संघाच्या शानदार विजयावर शिक्का मारत सिदराज शाहला ८६-७१ असा धक्का दिला.
एनएससीआय ‘यंगस्टर्स’ संघानेही दिमाखदार बाजी मारताना खार ‘जी.एस.टी.’चा ३-० असा फडशा पाडला. अभिषेक बजाजने दमदार विजयी सलामी देताना राहुल सचदेवला ९४-२२ असे एकतर्फी नमवले. सागर देसाई - रोनक देढिया यांनी दुसरी लढत दीपक कुबचंदानी - फैझल खान यांच्याविरुध्द ६४-५३ अशी जिंकताना संघाला २-० अशी महत्त्वपुर्ण आघाडी मिळवून दिली. यानंतर तिसºया फ्रेममध्ये जय श्रॉफने अर्जुन तेजवानीचा १००-९३ असा पराभव करुन संघाचा उप-उपांत्यपुर्व फेरी निश्चित केला.
>इतर निकाल
मलबार ‘मटका किंग’ वि.वि. एनआयए ‘क्वार्टरपिलर’ ३-०. (मनन शाह वि.वि. हर्नब शाह १०४-९२; मानव पांचाळ - नितिन बंका वि.वि. मनजीत सिंग - राजन गुप्ता ७०-४६; अक्षत केजरीवाल वि.वि. हार्दिक व्यास १०६-९५). जेव्हीपीजी ‘जगलर्स’ वि.वि. रेडिओ ‘जेन एक्स’ ३-१. (क्रिष्णा सराफ पराभूत वि. रेयान रझमी ५९-११०; धौर्य बी. वि.वि. शहयान रझमी ११५-७२; अदित राजा - झुबिन लेनिनवाला वि.वि. नेविल - राजेश ६६-५५; धैर्य भंडारी वि.वि. रेयान १०५-८५.)

Web Title: The journey of both the NSCI teams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.