फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद..., कॅप्टन रोहित भावूक; खुर्चीवर बसून रडताना दिसला, VIDEO व्हायरल

टीम इंडियाच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात रोहितने 39 चेंडूत 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या 171 धावांपर्यंत पोहोचवली. रोहित शर्माच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:13 AM2024-06-28T11:13:40+5:302024-06-28T11:14:24+5:30

whatsapp join usJoin us
Joy of reaching the t20 world cup 2024 final Captain Rohit emotional VIDEO viral | फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद..., कॅप्टन रोहित भावूक; खुर्चीवर बसून रडताना दिसला, VIDEO व्हायरल

फायनलमध्ये पोहोचल्याचा आनंद..., कॅप्टन रोहित भावूक; खुर्चीवर बसून रडताना दिसला, VIDEO व्हायरल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2024 च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा 68 धावांनी दणदणीत पराभव करत 10 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी भारत 2014 साली टी 20 वर्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. तेव्हा श्रीलंकेने भारताचा पराभव केला होता. याच बरबोर, भारताने टी-20 वर्ल्ड कप 2022 मध्ये उपांत्य फेरीत इंग्लंडकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. 

टीम इंडियाच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यात रोहितने 39 चेंडूत 57 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत टीम इंडियाची धावसंख्या 171 धावांपर्यंत पोहोचवली. रोहित शर्माच्या खेळीत 6 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.

खुर्चीवर बसून रडताना दिसला रोहित शर्मा - 
टीम इंडिया आता टी-20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसोबत लढणार आहे. हा सामना 29 जूनला बार्बाडोस येथे खेळला जाईल. भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा भावूक झाला होता. तो ड्रेसिंग रूमबाहेरील खुर्चीवर बसून रडत होता. सहकारी खेळाडू जेव्हा त्याला हस्तांदोलन करण्यासाठी आले तेव्हा तो अश्रू लपवताना दिसला.

रोहित शर्माला रडतानापाहून विराट कोहली त्याच्या जवळ आला आणि त्याने त्याला हसवण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोहित आपला चेहरा कॅमेऱ्यापासून लपवताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या कमेंट्सदेखील येत आहेत.
 

Web Title: Joy of reaching the t20 world cup 2024 final Captain Rohit emotional VIDEO viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.