"जॉयदीप या दिवसांत तू माझ्यासाठी जे काही केलंस ते..."; बालपणीच्या मित्रासाठी सौरव गांगुलीची भावूक पोस्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला मागील आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 03:30 PM2021-01-07T15:30:46+5:302021-01-07T15:32:23+5:30

whatsapp join usJoin us
"Joydeep, what have you done for me these days ..."; Sourav Ganguly's passionate post for a childhood friend | "जॉयदीप या दिवसांत तू माझ्यासाठी जे काही केलंस ते..."; बालपणीच्या मित्रासाठी सौरव गांगुलीची भावूक पोस्ट

"जॉयदीप या दिवसांत तू माझ्यासाठी जे काही केलंस ते..."; बालपणीच्या मित्रासाठी सौरव गांगुलीची भावूक पोस्ट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देसौरव गांगुलीला आज रुग्णालयातून देण्यात आला डिस्चार्जमित्रासाठी सोशल मीडियावर सौरवनं लिहिली भावूक पोस्ट

टीम इंडियाचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला मागील आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्याच्यावर कोलकातामधील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला आज सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, गांगुलीने आता मी एकदम ठणठणीत आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. 

"आपण आपला जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात येतो. हे खरं असल्याचं सिद्ध झालंय. मी वूडलँड्स रुग्णालय आणि माझी चांगली काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टरांना धन्यवाद देतो. मी आता ठिक आहे आणि लवकरच पुनरागमन करेन," असंही गांगुली म्हणाला होता. 

यानंतर सौरव गांगुलीनं आपल्या बालपणीच्या मित्रासाठी इन्स्टाग्रामवर संदेश लिहिला. "जॉयदीप मी तुला ४० वर्षांपासून ओळखतोय. तू माझ्या कुटुंबातील सदस्यापेक्षा कमी नाहीस. परंतु या पाच दिवसांमध्ये तू माझ्यासाठी जे काही केलंयस ते मी आयुष्यभर आठवणीत ठेवेन," अशी भावूक पोस्ट सौरव गांगुलीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.



डॉक्टरांकडून पाहणी

सौरवला डिस्चार्ज दिल्यानंतर रुग्णालयाबाहेर त्याच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी, दादाने चाहत्यांना उद्देशून छोटेखानी संवाद साधला. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि प्रार्थनांमुळे मला ताकद मिळाल्याचेही गांगुलंने म्हटलं. प्रसिद्ध सर्जन डॉ. देवी शेट्टी यांनी मंगळवारी हॉस्पिटलमध्ये जाऊन गांगुलीच्या प्रकृतीची पाहणी केली. अनेक भारतीयांमध्ये हृदयासंदर्भात आढळणारा आजार गांगुलीला झाला आहे. पण, त्यामुळे त्याच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होणार नाही. त्याच्यावर नित्यक्रमानं अँजिओप्लास्टीची गरज आहे आणि औषध व काळजी घेतल्यानंतर तो पुन्हा पूर्वीसारखा कामकाज करू शकतो. पुढील दोन आठवड्यात त्याच्यावर पुढील उपचार करण्यात येतील, असे शेट्टी यांनी सांगितले होते. गांगुलीवर उपचार करण्यासाठी १३ वैद्यकिय सदस्यांची टीम काम करत होती. गांगुलीची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

Web Title: "Joydeep, what have you done for me these days ..."; Sourav Ganguly's passionate post for a childhood friend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.