टीम इंडियाचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला मागील आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. त्याच्यावर कोलकातामधील वूडलँड्स हॉस्पिटलमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्याला आज सकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच, गांगुलीने आता मी एकदम ठणठणीत आहे अशी प्रतिक्रिया दिली होती. "आपण आपला जीव वाचवण्यासाठी रुग्णालयात येतो. हे खरं असल्याचं सिद्ध झालंय. मी वूडलँड्स रुग्णालय आणि माझी चांगली काळजी घेतल्याबद्दल सर्व डॉक्टरांना धन्यवाद देतो. मी आता ठिक आहे आणि लवकरच पुनरागमन करेन," असंही गांगुली म्हणाला होता. यानंतर सौरव गांगुलीनं आपल्या बालपणीच्या मित्रासाठी इन्स्टाग्रामवर संदेश लिहिला. "जॉयदीप मी तुला ४० वर्षांपासून ओळखतोय. तू माझ्या कुटुंबातील सदस्यापेक्षा कमी नाहीस. परंतु या पाच दिवसांमध्ये तू माझ्यासाठी जे काही केलंयस ते मी आयुष्यभर आठवणीत ठेवेन," अशी भावूक पोस्ट सौरव गांगुलीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- "जॉयदीप या दिवसांत तू माझ्यासाठी जे काही केलंस ते..."; बालपणीच्या मित्रासाठी सौरव गांगुलीची भावूक पोस्ट
"जॉयदीप या दिवसांत तू माझ्यासाठी जे काही केलंस ते..."; बालपणीच्या मित्रासाठी सौरव गांगुलीची भावूक पोस्ट
टीम इंडियाचा माजी कर्णधार व BCCI अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याला मागील आठवड्यात हृदयविकाराचा सौम्य झटका आला होता. ...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 3:30 PM
ठळक मुद्देसौरव गांगुलीला आज रुग्णालयातून देण्यात आला डिस्चार्जमित्रासाठी सोशल मीडियावर सौरवनं लिहिली भावूक पोस्ट