Junior Malinga Matheesha Pathirana Video, IPL 2022 GT vs CSK: गुजरात टायटन्सच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्जला २० षटकांत केवळ ५ बाद १३३ धावांपर्यंतच मजल मारता आली. ऋतुराज गायकवाडने डाव सावरण्यासाठी ४४ चेंडूत अर्धशतक ठोकलं. जगदीशननेही ३९ धावांची नाबाद खेळी केली. पण कोणत्याही फलंदाजाने फटकेबाजी न केल्याने CSK ला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. १३४ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने सुरूवात उत्तम केली होती. पण ज्युनियर मलिंगा महिशा पाथिराना याने आपल्या IPL कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेत चांगली सुरूवात केली.
वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल जोडीने दमदार सुरूवात केली होती. साहा फटकेबाजी करत होता. गिल मात्र संयमी खेळी खेळत होता. ७ षटकांचा खेळ झाला त्यावेळी गुजरातने ५९ धावा केल्या होत्या आणि ते आपल्या आव्हानाच्या दिशेने सहज आगेकूच करत होते. त्याच वेळी ज्युनियर मलिंगाने IPL कारकिर्दीतील आपल्या पहिल्याच चेंडूवर गिलला LBW केलं. गुजरातने DRSचा वापर केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्याला माघारी जावे लागले. पाहा Video-
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर डेवॉन कॉनवे ५ धावांत माघारी परतला. मोईन अलीने ऋतुराज गायकवाडला साथ दिली. पण दोन षटकार लगावल्यानंतर मोईन अली २१ धावांवर बाद झाला. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने जगदीशनच्या साथीने चांगली भागीदारी केली. ऋतुराजने ४९ चेंडूत ५३ धावांची खेळी केली. त्यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तो बाद होताच शिवम दुबेही शून्यावर माघारी गेला. पाठोपाठ धोनीही ७ धावा काढून बाद झाला. जगदीशनने शेवटपर्यंत किल्ला लढवत संघाला १३० पार स्कोअर नेऊन दिला.
Web Title: Junior Malinga Matheesha Pathirana takes wicket on his first ball of IPL Career Shubman Gill gets LBW watch Video IPL 2022 GT vs CSK
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.