नागपूर : वय व तंदुरुस्तीच्या आधुनिक निकषांना डावलून वसीम जाफरने नाबाद २८५ धावांची खेळी करीत युवा शेष भारत संघाविरुद्ध इराणी ट्रॉफी लढतीत गुरुवारी दुसऱ्या दिवशी विदर्भाला ३ बाद ५९८ धावांची मजल मारुन दिली. गणेश सतीशने (१२०) शतकी खेळी करीत जाफरला योग्य साथ दिली.व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या जात असलेल्या या लढतीत ४० वर्षीय जाफरने युवा गोलंदाजी आक्रमणावर वर्चस्व गाजवताना शानदार खेळी केली. शेष भारत संघात भारतीय संघाचा आॅफ स्पिनर आर. अश्विन व वेगवान गोलंदाज जयंत यादव यांचाही समावेश आहे.जाफरने कालच्या नाबाद ११३ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात करताना आज १७२ धावांची भर घातली. तो इराणी ट्रॉफीमध्ये शेष भारतातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावा फटकाविणारा फलंदाज ठरला आहे. त्याने मुरली विजयाचा २०१२-१३ मध्ये नोंदवलेला २६६ धावांचा विक्रम मोडला. जाफरने ४२५ चेंडूंना सामोरे जाताना ३४ चौकार व १ षटकार लगावला. गणेश सतीशने २८० चेंडूंना सामोरे जाताना १२० धावांची खेळी केली. त्याने जाफरसोबत तिसºया विकेटसाठी २८९ धावांची भागीदारी केली. त्यानंतर जाफरने अपूर्व वानखेडेसोबत (नाबाद ४४) चौथ्या विकेटसाठी ९१ धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. जाफरच्या त्रिशतकी खेळीनंतर विदर्भ डाव घोषित करणार असल्याचे निश्चित आहे.अश्विनने आजही लेगब्रेक मारा केला, पण त्याला बळी घेण्यात यश आले नाही. जाफरने त्याच्या ८३ चेंडूंना सामोरे जाताना ५४ धावा केल्या.भारतीय निवड समिती सदस्य युवा खेळाडूंची कामगिरी बघण्यासाठी आले होते, पण जाफरची संस्मरणीय खेळीच्या आठवणी घेऊन परतले.धावफलकविदर्भ पहिला डाव :- फैज फझल झे. सैनी गो. अश्विन ८९, संजय रामास्वामी झे. समर्थ$ गो. जयंत यादव ५३, वसीम जाफर खेळत आहे २८५, गणेश सतीश झे. भरत गो. कौल १२०, अपूर्व वानखेडे खेळत आहे ४४. अवांतर (७). एकूण १८० षटकांत ३ बाद ५९८. बाद क्रम : १-१०१, २-२१८, ३-५०७.. गोलंदाजी : नवदीप सैनी २८-६-९३-०, सिद्धार्थ कौल ३०-६-८०-१, रविचंद्रन अश्विन ४३-२-१२३-१, शाहबाज नदीम ३७-४-१३८-०, जयंत यादव ३८-३-१४९-१, रविकुमार समर्थ ४-०-९-०.>१८००० धावा पूर्ण करणारा सहावा भारतीयस्थानिक क्रिकेटमध्ये खोºयाने धावा वसूल करणाºया वसीम जाफरने आज इराणी ट्रॉफी सामन्यादरम्यान प्रथम श्रेणी सामन्यांत १८००० धावा पूर्ण केल्या. या स्पेशल क्लबमध्ये स्थान मिळवणारा जाफर सहावा भारतीय फलंदाज आहे.विदर्भातर्फे शेष भारत संघाविरुद्धच्या लढतीत जाफरने १७६ वी धाव घेतल्यानंतर हा पराक्रम केला. जाफरची ही २४२ वी प्रथम श्रेणी लढत आहे. त्याने जवळजवळ ५० प्रति डावाच्या सरासरीने धावा फटकावल्या आहेत. त्याच्या नावावर ५३ शतके व ८६ अर्धशतकांची नोंद आहे.भारतीय फलंदाजांमध्ये जाफरपूर्वी सुनील गावसकर (२५,८३४), सचिन तेंडुलकर (२५,३९६), राहुल द्रविड (२३,७९४), व्हीव्हीएस लक्ष्मण (१९,७३०) आणि विजय हजारे (१८,७४०) यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये १८००० पेक्षा अधिक धावा फटकावल्या आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विदर्भ संघाने उभारले धावांचे एव्हरेस्ट, जाफरचे नाबाद द्विशतक, गणेश सतीशचेही शतक
विदर्भ संघाने उभारले धावांचे एव्हरेस्ट, जाफरचे नाबाद द्विशतक, गणेश सतीशचेही शतक
वय व तंदुरुस्तीच्या आधुनिक निकषांना डावलून वसीम जाफरने नाबाद २८५ धावांची खेळी करीत युवा शेष भारत संघाविरुद्ध इराणी ट्रॉफी लढतीत गुरुवारी दुसऱ्या दिवशी विदर्भाला ३ बाद ५९८ धावांची मजल मारुन दिली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 1:35 AM