Just IN : ICC World Cup 2019 : भारताच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब; इंग्लंडची घसरण

वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आलेच आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 03:28 PM2019-06-27T15:28:57+5:302019-06-27T15:35:46+5:30

whatsapp join usJoin us
Just IN : ICC World Cup 2019 : India have displaced England as the No.1 ranked side on the ICC ODI Team Rankings | Just IN : ICC World Cup 2019 : भारताच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब; इंग्लंडची घसरण

Just IN : ICC World Cup 2019 : भारताच्या अव्वल स्थानावर शिक्कामोर्तब; इंग्लंडची घसरण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : वर्ल्ड कप स्पर्धेतील सलग तीन पराभवामुळे इंग्लंड संघाचे उपांत्य फेरीतील स्थान धोक्यात आलेच आहे. शिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वन डे क्रमवारीतील अव्वल स्थानही त्यांना गमवावे लागले आहे. ताज्या क्रमवारीनुसार इंग्लंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली असून भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. भारतीय संघ 123 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे, तर इंग्लंडला दोन गुणांचा तोटा सहन करावा लागला आहे. त्यांच्या खात्यात 122 गुण आहेत. मे 2018 पासून इंग्लंड अव्वल स्थानावर होता. 



यजमान इंग्लंड संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना पाकिस्तान, श्रीलंका व ऑस्ट्रेलिया यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. सात सामन्यानंतर त्यांच्या खात्यात 8 गुण जमा आहेत आणि उर्वरित दोन सामन्यात त्यांना भारत व न्यूझीलंड या तगड्या प्रतिस्पर्धींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे त्यांचा उपांत्य फेरीतील प्रवेश हा अनिश्चित मानला जात आहे. दुसरीकडे भारतीय संघ पाच सामन्यांत ( 4 विजय व 1 अनिर्णीत) 9 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड दोन गुणांची कमाई करून ( 116 गुण) तिसऱ्या स्थानी कायम आहे, तर दक्षिण आफ्रिकेची घसरण झाली असून ऑस्ट्रेलिया तीन गुणांच्या कमाईसह ( 112 गुण) चौथ्या स्थानी आले आहेत.


यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रथम प्रवेश करण्याचा मान गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने पटकावला. न्यूझीलंड आणि भारत उंबरठ्यावरच आहेत, परंतु चौथ्या स्थानासाठी आता इंग्लंडसह आणखी तीन संघ आहेत. इंग्लंडचा हा पराभव बांगलादेश, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना आशेचा किरण दाखवणारा ठरला आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात येत्या रविवारी सामना होणार आहे. भारतीय संघाने आज विंडीजवर विजय मिळवल्यास त्यांच्या खात्यात 124 गुण होतील आणि इंग्लंडचे 121 गुण होतील. पण जर भारताविरुद्ध इंग्लंडने विजय मिळवल्यास यजमान पुन्हा अव्वल स्थानावर येतील. 

Web Title: Just IN : ICC World Cup 2019 : India have displaced England as the No.1 ranked side on the ICC ODI Team Rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.