आशिया चषकाच्या आयोजनावरून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ( PCB ) आणि BCCI यांच्यात अजूनही वाद सुरूच आहेत. आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, परंतु बीसीसीआयने टीम इंडियाला पाठवण्यास नकार दिल्याने ९ सामने श्रीलंकेत आयोजित करावे लागत आहेत. पण, श्रीलंकेत पावसामुळे सामन्यांवर संकट आहे आणि यावरून PCB ने वारंवार आशियाई क्रिकेट परिषदेचे ( ACC) अध्यक्ष व बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यावर टीकासत्र सुरू ठेवले. त्याला शेवटी जय शाह यांनीही लांबलचक पत्र लिहून उत्तर दिले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Shahid Afridi) याला चांगलीच मिर्ची झोंबली आहे आणि त्याने जय शाह यांच्यावर टीका केली आहे.
PCBच्या आरोपांना जय शाह यांचे उत्तर; भारतच नव्हे तर कोणाचीच पाकिस्तानात खेळण्याची इच्छा नाहीपाकिस्तानने ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्याचाही प्रस्ताव ठेवला होता, परंतु ACC ने श्रीलंकेची निवड केली. पण, पावसामुळे येथे व्यत्यय येतोय... आजही टीम इंडियाला कोलंबोत सुरू असलेल्या पावसामुळे इंडोअर सराव करावा लागला आहे. २ सप्टेंबरला भारत-पाकिस्तान यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. सुपर ४ चे सामने कोलंबोत होणार आहेत आणि तेथे जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोलंबोतील सामने दुसरीकडे हलवण्याचीही मागणी झाली, परंतु ऐनवेळी ACC ने भुमिका बदलली असाही आरोप PCB कडून केला गेला.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखपदी झालेले बदल अन् अन्य काही कारणांमुळे हा मुद्दा गुंतागुंतीचा झाल्याचे जय शाह यांनी म्हटले होते. शाह यांनी सांगितले होते की, सुरुवातीला ACCचे सदस्य असलेले सर्व संघ, मीडिया हक्क धारक असे अनेक जण पाकिस्तानात आशिया चषकाच्या आयोजनासाठी तयार नव्हते. ही अनिश्चितता देशातील सुरक्षा आणि आर्थिक परिस्थितीशी संबंधित चिंतेमुळे उद्भवली आहे, ”
जय शाह यांच्या या विधानावर शाहिद आफ्रिदीने टीका केलीय. २००९ मध्ये श्रीलंकन टीमच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता आणि त्यानंतर तेथे आंतरराष्ट्रीय सामने झालेच नव्हते. पण, आफ्रिदीच्या मते त्यानंतर परिस्थिती बदलली आहे. त्याने लिहिले की, पाकिस्तानातील सुरक्षेवर विधान करणाऱ्या जय शाह यांना सांगु इच्छितो की, जरा आपल्या डोक्यातील जळमटं काढून टाका. पाकिस्तानने मागील ६ वर्षांत अनेक आंतरराष्ट्रीय संघांसोबत घरच्या मैदानावर मालिका खेळल्या आहेत. 2017 – ICC World XI & SL2018 – WI2019 – WI (W), BD (W) & SL2020 – BD, PSL, MCC & Zim2021 – WI, PSL, SA & WI2022 – Aus, PSL, WI, BD U19, Ireland (W) & Eng (2),2023 – NZ (2), PSL, Women’s Exhibition Matches, #AsiaCup2023 (Nep, SL, Afg & BD) & SA (W).”आता पाकिस्तान २०२५च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचेही यजमानपद भूषविणार आहे.