तामिळनाडूमध्ये 19 जूनला पी. जयराज ( 59) आणि त्यांचा मुलगा फेनिक्स ( 31) यांचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. लॉकडाऊनमध्ये दिलेल्या वेळेपेक्षा अधिककाळ जयराज आणि फेनिक्स यांनी त्यांचं मोबाईलचं दुकान सुरू ठेवलं होतं. त्यानंतर पोलिसांनी शुक्रवारी त्यांना अटक केली आणि पोलिस कोठडीत त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या दोघांना बेदम मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. जयराज व फेनिक्स यांचे मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांनी नकार दिला आहे. त्यांनी पोलिसांवर हत्येचा गुन्हा नोंदवला जावा, अशी मागणी केली आहे. या कुटुंबीयांना टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवन यानंही पाठींबा दर्शवला आहे. त्याचं ट्विट व्हायरल होत आहे.
दाक्षिणात्य सुपरस्टार्सही या मोहिमेत उतरले आहेत. अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर हिनंही त्या पिता-पुत्राला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. जयराज व फेनिक्स यांना नग्न करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांच्या शरिरातून प्रचंड रक्त वाहिले होते, असा दावा अनेकांनी केला आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
India-China बॉर्डरवरच्या भारतीय जवानाची देशवासीयांना साद; 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला Video
मोहम्मद हाफिजच्या बंडानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं डोकं टाळ्यावर; घेतला मोठा निर्णय
वर्ल्ड कपमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी घडलं होतं असं काहीतरी...; विजय शंकरचा मोठा खुलासा
आता मोदी सरकार कच्चं तेल इराककडून खरेदी करणार नाही, तर...; जितेंद्र आव्हाडांचा टोला
वेस्ट इंडिजच्या कर्णधाराचे टी 10लीगमध्ये धडाकेबाज शतक, युवराज सिंगचा विक्रम थोडक्यात वाचला
'ती' विनंती अमान्य; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा BCCIला दणका, IPL 2020वर संकट!
ICC वर्णद्वेषी? वेस्ट इंडिजची मक्तेदारी षड्यंत्रानं संपवली, डॅरेन सॅमीचा गंभीर आरोप
फेव्हरिट वहिनी कोण? बाबर आझमच्या उत्तरावर भडकली सानिया मिर्झा, म्हणाली...