सेंचुरियन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत यष्टिरक्षण करण्यासाठी के. एल. राहुल सज्ज आहे. राहुल यष्टिरक्षण करण्यासाठी आत्मविश्वासाने भरलेला आहे, असे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले.
नवा यष्टिरक्षक केएस भरत याची फलंदाजी कमकुवत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाकडे इशान किशनच्या रूपात अन्य पर्याय होता, पण त्याने मानसिक आरोग्यावर लक्ष देण्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. अशावेळी भारताकडे राहुलचाच श्रेष्ठ पर्याय आहे. राहुल द्रविड म्हणाले की, एक आव्हान म्हणून मी याकडे पाहत आहे. काहीतरी वेगळे करण्याची त्याचाकडे ही चांगली संधी आहे. इशान येथे नसल्यामुळे त्याला संधी मिळाली आहे. आमच्याकडे निवडीसाठी दोन यष्टिरक्षक आहेत. त्यातील एक राहुल आहे. आम्ही त्याच्यासोबत याबाबत चर्चा केली आणि तो पूर्णपणे सज्ज आहे. ही जबाबदारी सांभाळण्यासाठी राहुल उत्साहित आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टिरक्षण करणे आव्हानात्मक असते हे राहुल द्रविड यांना ठाऊक आहे. मात्र, के. एल. राहुल नक्कीच अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास त्यांना आहे.