इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातला दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले. त्यानंतर येत्या शनिवारी दक्षिण आफ्रिकेतही क्रिकेटचे कमबॅक होत आहे. पण, एका आगळ्यावेगळ्या सामन्यानं. या सामन्यात दोन नव्हे, तर तीन संघ एकाच वेळ एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. पण, या सामन्यापूर्वी किंगफिशर्स संघाला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा कर्णधार कागिसो रबाडानं माघार घेतली आहे. त्याच्यासह अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिस हाही या सामन्याला मुकणार आहे.
किंग फिशर्स, क्विंटी काईट्स आणि एबी ईगल्स असे तीन संघ या सामन्यात खेळणार असून अनुक्रमे कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हिलियर्स हे या संघांचे नेतृत्व करणार आहेत. पण, रबाडाच्या कुटुंबातील सदस्याचे निधन झाल्यामुळे त्याला सामन्यात खेळता येणार नाही. गोलंदाज सिसांडा मगाला याच्याही कुटुंबातील सदस्याचे निधन झाले आहे आणि त्यानंही माघार घेतली आहे. रबाडा, मॉरिस आणि मगाला यांच्याजागी आता अनुक्रमे थांडो एनटीनी, ब्योन फोर्टिन आणि गेराल्ड कोएट्जी यांचा समावेश करण्यात आला आहे. रबाडाच्या अनुपस्थितीत हेन्रीक क्लासेन किंग फिशर्स संघाचे नेतृत्व सांभाळेल.
स्विमर, वॉटर पोलो खेळाडू अन् वकील; जगातील स्फोटक फलंदाजाच्या पत्नीची चर्चा!
Solidarity Cup असे या मॅचला नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश असेल आणि 36 षटकांच्या सामन्यात प्रत्येक संघाला 12 षटकं खेळण्याची संधी दिली जाणार आहे. एक संघ उर्वरित दोन संघांविरुद्ध 6-6 षटकांच्या ब्रेकसह 12 षटके फलंदाजी करेल. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल. पण, त्याची एकेरी धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याला केवळ दुहेरी धाव घ्यावी लागेल. प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो. 12 षटकांत सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल. विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक दिले जाईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल.
Web Title: Kagiso Rabada, Chris Morris pull out of 3TC match in Centurion
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.