Join us  

Kagiso Rabada ने हिंदीत सासू-सासऱ्यांची केली मनधरणी, व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही!

Kagiso Rabada : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 12:09 PM

Open in App

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाला सुरूवात झाली आहे. सध्या या स्पर्धेतील सराव सामन्यांचा थरार रंगला आहे. काल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने 9 गडी राखून मोठा विजय मिळवला. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. 

मैदानात फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या कगिसो रबाडाची हिंदी बोलताना त त फ फ झाल्याची दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही तसेच म्हणाल. कगिसो रबाडा आपल्या प्रेयसीच्या आई-वडिलांना इम्प्रेस करण्यासाठी आरजे करिष्माकडून टिप्स घेताना दिसत आहे. मात्र, यावेळी हिंदी बोलताना कगिसो रबाडाने खूप चुका केल्या, हे पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. दरम्यान, कगिसो रबाडा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे.

कगिसो रबाडासोबत या व्हिडीओमध्ये आरजे करिष्मा दिसत आहे. एकमेकांचा हात हातात घेत त्यांनी हा व्हिडीओ बनवला आहे. "नमस्ते मम्मी जी, ईस्ट या वेस्ट, मेरी मम्मी सबसे बेस्ट. मैं आपके परिवार को पाके धनिया हो गया हूं.' यावर करिश्माने त्याला रोखले आणि सांगितले की,'धन्य हो गया हूं, धनिया नहीं." त्यानंतर सासऱ्याचे मन वळवण्यासाठी कगिसो रबाडा म्हणाला, "नमस्ते सुअर जी", तेव्हा करिश्मा पुन्हा एकदा त्याला थांबवते आणि सांगते, 'ससुर जी'. त्यानंतर कगिसो रबाडा माफी मागतो आणि सांगतो, "सॉरी में तुमे चाहता हूं". पुन्हा चूक झाल्याचे सांगून करिश्मा म्हणते, "क्षमा चाहता हूं, तुमे नहीं." एवढं सांगून दोघं निघून जातात.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज टी 20 वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत एकाच गटात आहेत. दरम्यान, सध्या वर्ल्डकपसाठी सराव सामन्यांचा थरार रंगला आहे. काल दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने 9 गडी राखून मोठा विजय मिळवला. न्यूझीलंडचा संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या 98 धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या संघाने केवळ 1 गडी गमावून या सोप्या आव्हानाचा पाठलाग केला.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२द. आफ्रिकासोशल मीडिया
Open in App