मुंबई : २९ व्या कल्पेश गोविंद कोळी स्मृती चषकाच्या उपांत्य फेरीत कलिना विभाग अ आणि घाटकोपर विभाग ब संघांनी विजय मिळवला. घाटकोपर विभाग अ संघाच्या अमन खानच्या (४/४७) फिरकी गोलंदाजीने ठाणे विभाग ब संघाला पहिल्या डावर १४ धावांनी पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात बलाढ्य कालिना विभाग अ संघाला १३९ धावात गुंडाळले आणि कालिना विभाग ब फलंदाजी करताना ३४५ धावांचा डोगंर रचला आणि सहज पहील्या डावावर विजय मिळवत अंतिम फेरीत दाखल झाले. अंतिम फेरीचे सामने २४ व २५ मे रोजी न्यू हिंद स्पोर्टिग क्लब माटूंगा येथे रंगणार आहे. त्याचे थेट प्रक्षेपण यु ट्युब आणि फेसबुक वर दाखवण्यात येईल.
कलिना विभाग (अ):- १३९/१० ( राजसिंग देशमुख ३४,झेनिथ सचदेव ४/४३,उमर खान ४/२०) आणि १९९/९ (राजसिंग देशमुख ६४, क्रिश सुभ्रमण्यम ३९, उमर खान २/४८, झेनिथ सचदेव २/५१, आयुष्य जेथव २/१९, अंक्रीश रघुवंशी २/६) पहिल्या डावावर पराभूत विरुद्ध cकलिना विभाग (ब):- ३४५/१० ( जश गानिगा ६०,अंक्रीश रघुवंशी, ६०, शाश्वत झुनझुनवाला ४४, मनन भट ३२, तेजस चाळके ३/५८, शुभम खरात २/४४, रोनित ठाकूर २/८८) सामनावीर :उमर खान
घाटकोपर विभाग (अ) :- १८१/१० ( पूजन राऊत ४३, अभिनव सिंग ८१, जय धात्रक ५/३७) आणि १६३/९ डाव घोषित (अभिनव सिंग ५०, आर्यन दलाल ३/६६, आकाश सिंग ३/३९) पहिल्या डावावर विजयी विरुद्ध ठाणे विभाग (ब) :- १६७/१० (आकाश सिंग ९८, हर्ष मेंडोन २/२९, अमन खान ४/४७, सिद्धांत वालावलकर २/३६) सामनावीर : अभिनव सिंग