Kamindu Mendis ची कमाल; ICC पुरस्कार जिंकण्याचाही सेट केला नवा विक्रम

मागच्या महिन्यातील कामगिरीच्या आधारावर आयसीसीने पुरुष गटातून 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारचा तो मानकरी असल्याचे जाहीर केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 04:23 PM2024-10-14T16:23:03+5:302024-10-14T16:25:05+5:30

whatsapp join usJoin us
Kamindu Mendis | Kamindu Mendis ची कमाल; ICC पुरस्कार जिंकण्याचाही सेट केला नवा विक्रम

Kamindu Mendis ची कमाल; ICC पुरस्कार जिंकण्याचाही सेट केला नवा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kamindu Mendis ICC Player of the Month for September : श्रीलंकेचा स्टार बॅटरनं आणखी एक खास विक्रम आपल्या नावे केला आहे. शतकासह वेगवेगळ्या विक्रमांची 'बरसात' करत सप्टेंबर महिना गाजवणाऱ्या या खेळाडूला आयसीसीचा 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कार जाहीर झाला आहे. मागच्या महिन्यातील कामगिरीच्या आधारावर आयसीसीने पुरुष गटातून 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारचा तो मानकरी असल्याचे जाहीर केले. 

जयसूर्या अन् ट्रॅविड हेडला धोबीपछाड

आयसीसी 'प्लेयर ऑफ द मंथ' पुरस्कारासाठी मेंडिसशिवाय श्रीलंकन फिरकीपटू प्रभात जयसूर्या आणि ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ट्रॅविस हेड ही मंडळी शर्यतीत होती. पण त्यांना मागे टाकत मेंडिसनं मानाचा आणि प्रतिष्ठित पुरस्कारवर नाव कोरले.  विशेष म्हणजे या वर्षात दुसऱ्यांदा त्याला हा पुरस्कार मिळाला आहे. २०२४ या कॅलेंडर ईयरमध्ये दोन वेळा हा पुरस्कार मिळवणारा तो पहिला खेळाडूही ठरलाय.

श्रीलंकेच्या गड्यानं सप्टेंबर महिना गाजवला

श्रीलंकेच्या ताफ्यातील कामिंदु मेंडिस याने सप्टेंबर महिना गाजवला होता. न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याने सातत्यपूर्ण खेळीचा नजराणा पेश करत अनेक विक्रम प्रस्थापित केले. या मालिकेत त्याच्या भात्यातून  ११४ आणि १८२* धावांची खेळी पाहायला मिळाली होती. श्रीलंकेच्या या फलंदाजाने पदार्पणानंतर सलग आठ कसोटी सामन्यात ५० पेक्षा धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्डही प्रस्थापित केला. एवढेच नाही तर मागील ७५ वर्षात कसोटीत सर्वात जलद १००० धावा करण्याचा पराक्रमही त्याने करून दाखवला. सप्टेंबर महिन्यात या श्रीलंकन फलंदाजानं ९०.२० च्या सरासरीनं ४५१ धावा केल्या आहेत.

या आधी मार्चमध्ये झाला होता सन्मान 

कामिंदू मेंडिस याने याआधी मार्चमध्ये या पुरस्कारावर नाव कोरले होते. त्यावेळी त्याने आयर्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क अडायर आणि न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री यांना मागे टागत ICC च्या वतीने महिन्याला देण्यात येणारा पुरस्कार पटकवला होता. आयसीसीकडून हा पुरस्कार पटकवणारा कामिंदू मेंडिस हा तिसरा श्रीलंकन खेळाडू आहे. याआधी  प्रभात जयसूर्या आणि वानिंदू हसरंगा यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मेंडिसनं या दिग्गजांना मागे टाकून दुसऱ्यांदा या पुरस्कारावर शिक्कामोर्तब केला आहे. 
 

Web Title: Kamindu Mendis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.