Join us  

रोहित-विराटने निवृत्त होण्याआधी पाकिस्तान दौऱ्यावर यावं कारण...; माजी खेळाडूचं अजब विधान

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 1:45 PM

Open in App

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटच्या मैदानातील कट्टर प्रतिस्पर्धी. हे दोन संघ क्रिकेटच्या मैदानात भिडणार म्हटलं की अवघ्या जगाचे लक्ष या सामन्याकडे लागते. दोन्ही देशातील तणावाच्या संबंधामुळे भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जात नाही. किंबहुना मागील मोठ्या कालावधीपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होत नाही. हे संघ केवळ आयसीसी स्पर्धा आणि आशिया चषकाच्या स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळतात. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची स्पर्धा पाकिस्तानच्या धरतीवर होणार आहे. पण, त्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानात जाणार नसल्याचे कळते. 

दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने विराट कोहलीचे कौतुक करताना एक मोठे विधान केले. विराट कोहली पाकिस्तानात पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंपेक्षा खूप लोकप्रिय आहे. मला वाटते की, विराट आणि रोहित शर्मा यांनी निवृत्त होण्याआधी एकदा पाकिस्तानचा दौरा करायला पाहिजे. मग त्यांच्या लक्षात येईल की पाकिस्तानात त्यांचे किती चाहते आहेत, असे कामरान अकलमने सांगितले. 

एका वृत्तपत्राशी बोलताना अकमलने सांगितले की, विराट आणि रोहित यांनी निवृत्त होण्याआधी पाकिस्तान दौरा करायला हवा. ते जागितक क्रिकेटमधील सुपरस्टार आहेत, ते क्रिकेटसाठी जगभर प्रवास करत असतात. प्रत्येक चाहता त्यांची प्रशंसा करत असतो. त्यांच्यात असलेली प्रतिभा यामुळे त्यांचे करोडो चाहते आहेत. त्यात पाकिस्तानात विराट-रोहितचे सर्वाधिक चाहते आहेत.

पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले आहे. १९९६च्या वर्ल्ड कपनंतर पाकिस्तानमध्ये बऱ्याच वर्षांची आयसीसीची स्पर्धा होणार आहे. पण, टीम इंडियाच्या सहभागावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.  दोन्ही देशांतील राजकीय परिस्थिती पाहता द्विपक्षीय मालिकाही बंद झाल्या आहेत. त्यात नुकतेच आशिया चषक २०२३च्या यजमानपदावरून नाट्य रंगले होते. आता तसेच नाट्य चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी रंगताना दिसणार आहे. 

टॅग्स :पाकिस्तानविराट कोहलीरोहित शर्मा