केन विल्यमसन आणि टीम साऊदी हे सहा मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार नाहीत. न्यूझीलंडने २०२३च्या जानेवारीत पाकिस्तान दौऱ्यावर येणार आहे, परंतु त्यानंतर भारत दौऱ्यावर हा संघ येईल. मात्र, या संघात केन व टीम हे अनुभवी खेळाडू नसतील. टॉम लॅथम भारत दौऱ्यावर न्यूझीलंडच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. केन व साऊदी पुढील महिन्यात पाकिस्तानच्या दौर्यानंतर मायदेशी परततील आणि फेब्रुवारीपासून इंग्लंडविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेची तयारी सुरू करतील.
निवड समिती प्रमुके गेव्हीन लार्सन म्हणाले की, "आमच्यासाठी इंग्लंडविरुद्धचे दोन कसोटी सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे केन आणि टीमला पाकिस्तान दौऱ्यावरून मायदेशात परत यायचे आहे. त्यांना मानसिक आणि शारीरिकरित्या तंदुरुस्त ठेवणए अत्यंत महत्त्वाचे आहे."
विल्यमसनने गेल्या आठवड्यात अनुभवी वेगवान गोलंदाज साऊदीकडे कसोटी कर्णधारपद सोपवले, परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तो कर्णधार राहील. १७ खेळाडूंचा संघ पाकिस्तानमध्ये १०-१४ जानेवारी आणि भारतात १८-२४ जानेवारी दरम्यान वन डे मालिका खेळेल. मार्क चॅप्मन आणि जेकब डफी भारतात विल्यमसन आणि साऊदीची जागा घेतील आणि टॉम लॅथम कर्णधारपद स्वीकारेल. ट्रेंट बोल्ट आणि अष्टपैलू जिमी नीशम हे दोघेही NZC करार नाकारल्यानंतर आणि ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश T20 लीगमध्ये खेळण्यासाठी साइन इन केल्यानंतर राष्ट्रीय कर्तव्यासाठी उपलब्ध नाहीत. वेगवान गोलंदाज काइल जेमिसन पाठीच्या दुखापतीमुळे अनुपलब्ध आहे.
अष्टपैलू खेळाडू हेन्री शिपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या वर्ल्ड कपपूर्वी जगातील अव्वल क्रमांकावर असलेल्या वन डे संघासाठी दोन्ही मालिका बहुमोल ठरतील, असे लार्सन म्हणाले.
पाकिस्तान आणि भारतातील वन डे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ:केन विल्यमसन (कर्णधार, फक्त पाकिस्तान मालिका), फिन ऍलन, मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅप्मन (केवळ भारत), डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी (फक्त भारत), लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (कर्णधार भारताविरुद्ध), अॅडम मिल्ने, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, हेन्री शिपले, ईश सोधी, टिम साउथी (फक्त पाकिस्तान)
भारत-न्यूझीलंड पहिली वन डे - १८ जानेवारी, हैदराबाद दुसरी वन डे - २१ जानेवारी, रायपूरतिसरी वन डे - २४ जानेवारी, इंदूर
पहिली ट्वेंटी-२० - २७ जानेवारी, रांचीदुसरी ट्वेंटी-२० - २९ जानेवारी, लखनौतिसरी ट्वेंटी-२० - १ फेब्रुवारी, अहमदाबाद
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"