Join us  

Kane Williamson controversy IPL 2022 : काव्या मारनच्या SRHसोबत पुन्हा चिटींग झाली; केन विलियम्सनची विकेट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली, Video 

Kane Williamson controversy IPL 2022 : आयपीएल २०२२मधील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध केनची विकेट वादात अडकली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2022 3:43 PM

Open in App

Kane Williamson controversy IPL 2022 : इंडियन प्रीमिअर लीगचे १५ वे पर्वात वादाची सुरूवात झालेली पाहायला मिळत आहे. सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाचा कर्णधार केन विलियम्सन हा या वादाच्या केंद्रस्थानी  आहे. आयपीएल २०२२मधील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध केनची विकेट वादात अडकली होती. देवदत्त पडिक्कलने स्लीपमध्ये घेतलेला त्याच्या झेलवरून वाद निर्माण झाला अन् त्यानंतर SRHने तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयाचा निषेध नोंदवताना थेट BCCI कडे धाव घेतली होती. काल लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants ) विरुद्धच्या लढतीतही केनची विकेट  वादग्रस्त ठरत आहे. त्यामुळे आता SRH चा संघ पुढे काय पाऊल उचलते याची उत्सुकता आहे. 

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या लढतीतील आवेश खानने टाकलेल्या चौथ्या षटकात केन विलियम्सन बाद झाला. आवेशने टाकलेला चेंडू फ्लिक करण्याच्या प्रयत्नात विलियम्सनने टोलावलेला चेंडू फाईन लेगवर टिपला गेला. पण, विलियम्सनसाठी जेव्हा क्षेत्ररक्षण लावण्यात आले होते. त्यावरून एका नेटिझन्सने प्रश्न उपस्थित केला आहे. पहिल्या पॉवर प्लेमध्ये ३० यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त २ खेळाडूंना ठेवण्याचा नियम असताना विलियम्सनची विकेट पडली त्या चेंडूवर तीन खेळाडू सर्कल बाहेर होते. त्यानुसार विलियम्सन ज्या चेंडूवर बाद झाला  तो No-Ball द्यायला हवा होता.

पाहा व्हिडीओ..  दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने ही  लढत १२ धावांनी गमावली. कर्णधार लोकेश राहुल ( ६८) व दीपक हुडा ( ५१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर LSG ने ७ बाद १६९ धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन व रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, राहुल त्रिपाठी ( ४४) व निकोलस पूरन (  ३८) यांनी संघर्ष दाखवला. केन १६ धावांवर बाद झाला. SRHला ९ बाद १५७ धावांपर्यंतच मजल मारता आली. 

टॅग्स :आयपीएल २०२२केन विल्यमसनसनरायझर्स हैदराबादलखनौ सुपर जायंट्स
Open in App