Join us  

Kane Williamson DRS Drama, IPL 2022 PBKS vs SRH Live: फुल्ल ऑन ड्रामा! विल्यमसनचं शेवटच्या सेकंदाला LBWसाठी DRS, बॅटला कट तरीही आऊट!

फलंदाज आणि अंपायर्स यांच्यातही काही काळ वाद झाल्याचे दिसत होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2022 6:45 PM

Open in App

Kane Williamson DRS Drama, IPL 2022 PBKS vs SRH Live: सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात पंजाबचा पहिला गडी लवकर बाद झाला. दुसरा गडी बाद होताना मात्र अनेक नाट्यमय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले. नटराजन गोलंदाजी करत असताना मयंक अग्रवालच्या जागी संघात असलेल्या प्रभसिमरनने फलंदाजी केली. त्याच्या गोलंदाजीवर LBW साठी केन विल्यमसनने DRSची मागणी केली. चेंडू बॅटला लागल्याचे दिसले तरीही फलंदाजाला क्रिकेटच्या नियमानुसार बाद ठरवण्यात आले.

नटराजन गोलंदाजी करत असताना प्रभसिमरन सिंगने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू त्याला मारता न आल्याने किपरकडे गेला. किपरने चेंडू स्टंपवर फेकून त्याला रन आऊट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात किपर यशस्वी झाला नाही. त्यानंतर केन विल्यमसनने अगदी शेवटच्या सेकंदाला LBW साठी DRSची मागणी केली. DRS मध्ये मात्र चेंडू बॅटला लागल्याचे दिसले. त्यामुळे व्हिडीओ पुढे चालवण्यात आला. त्यात चेंडू बॅटला लागल्यानंतर किपरने झेल टिपल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे, नियमानुसार प्रभसिमरनला बाद ठरवण्यात आले. पाहा व्हिडीओ-

दरम्यान, पंजाबच्या डावाबाबत बोलायचे झाल्यास, मयंकला विश्रांती दिल्याने हंगामी कर्णधार शिखर धवन आणि प्रभसिमरन दोघे सलामीला आले. धवन ८ तर प्रभसिमरन १४ धावांवर बाद झाला. जॉनी बेअरस्टो (१२) आणि जितेश शर्मा (११) हे दोघेही स्वस्तात बाद झाले. लियम लिव्हिंगस्टोनने मात्र शाहरुख खानच्या साथीने दमदार भागीदारी केली. शाहरूख खान २६ धावांवर माघारी परतला. पण लियम लिव्हिंगस्टोनने अर्धशतक ठोकले. त्याने ३३ चेंडूत ६० धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात उमरान मलिकच्या भेदक माऱ्यामुळे पंजाबला १५१ धावाच करता आल्या.

टॅग्स :आयपीएल २०२२केन विल्यमसनसनरायझर्स हैदराबादपंजाब किंग्स
Open in App