इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व स्थगित केल्यानंतर भारतीय तसेच परदेशी खेळाडू आपापल्या घरी रवाना झाले. ऑस्ट्रेलियन खेळाडू १५ मे पर्यंत मालदीवमध्येच राहणार आहेत. भारतातून येणाऱ्या विमानसेवांना ऑस्ट्रेलियन सरकारनं बंदी घातली आहे. पण, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड या देशांतील खेळाडू आपापल्या घरी परतले आहेत. न्यूझीलंडचेही बहुतेक खेळाडू मायदेशी परतले असून फक्त केन विलियम्सन, कायले जेमिन्सन व मिचेल सँटनर व फिजिओ टॉमी सिम्सेक हे अजूनही भारतात आहेत. नवी दिल्ली येथे त्यांच्यासाठी मिनी बायो बबल तयार केला असून १० मे पर्यंत त्यांना त्यात रहावे लागणार आहे. ११ तारखेला हे खेळाडू इंग्लंडसाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेटनं दिली आहे. चार महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया ३० खेळाडूंचा संघ पाठवणार; जाणून घ्या कोणाला संधी मिळणार!
''न्यूझीलंड कसोटी संघातील सदस्य जे आयपीएलमध्ये खेळत होते, ते ११ मे रोजी लंडनसाठी रवाना होणार आहेत. त्यामुळे विलियम्सन, जेमिन्सन, सँटनर यांच्यासह फिजीओ टॉमी सिम्सेक हे भारतातूनच लंडनसाठी रवाना होतील. ते सध्या नवी दिल्ली येथे मिनी बायो बबलमध्ये आहेत,''अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेटनं दिली. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलपूर्वी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरुद्ध दोन कसोटी सामने खेळणार आहे. मुंबई इंडियन्सचा जलदगती गोलंदाज ट्रेंट बोल्ट मायदेशी परतणार असून कुटुंबीयांची भेट घेऊन तो लंडनमध्ये दाखल होईल. तो पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता आहे. बोल्ट ८ मे ला भारतातून मायदेशासाठी रवाना होईल. ''न्यूझीलंडचे उर्वरित खेळाडू व स्टाफ सदस्य, समालोचक हे उद्या नवी दिल्ली येथून दोन चार्टर्ड फ्लाईट्सने ऑकलंडसाठी रवाना होतील. शनिवारी ते न्यूझींडमध्ये दाखल होती आणि त्यानंतर क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करतील,'' असेही न्यूझीलंड क्रिकेटने म्हटले आहे. WTC final squad : ४ सलामीवीर, ९ जलदगती गोलंदाज अन् २-३ यष्टिरक्षक; BCCI निवडणार टीम इंडियाचा जम्बो संघ!
न्यूझीलंड संघाचा ट्रेनर ख्रिस डोनाल्डसन हा कोलकाता नाईट रायडर्सचे सदस्य होता आणि तोही कुटुंबीयांना भेटण्यासाठी मायदेशात परतणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ १६ किंवा १७ मे ला लंडनसाठी रवाना होईल