केन विलियम्सनचे ३२ वे कसोटी शतक; मोडला सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांचा विक्रम 

न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आणखी एक शतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 10:25 AM2024-02-16T10:25:20+5:302024-02-16T10:26:00+5:30

whatsapp join usJoin us
Kane Williamson registered Fastest to score 32 centuries in Tests (By Inns), break Sunil Gavaskar record | केन विलियम्सनचे ३२ वे कसोटी शतक; मोडला सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांचा विक्रम 

केन विलियम्सनचे ३२ वे कसोटी शतक; मोडला सुनील गावस्कर यांच्यासह अनेकांचा विक्रम 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kane Williamson NZ vs SA 2nd Test  ( Marathi News ) :  न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सन याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत आणखी एक शतक झळकावले. दोन सामन्यांच्या मालिकेतील हे त्याचे तिसरे शतक ठरले आणि त्याचे हे कसोटीतील ३२वे शतक ठरले.  न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेत ३ किंवा त्यापेक्षा अधिक शतक झळकावणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीतही विजय मिळवला.


दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील २४२ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २११ धावांवर गडगडला. आफ्रिकेचा पदार्पणवीर गोलंदाज डेन पिएड्तने पाच विकेट्स घेतल्या. पण, त्याच्या मेहनतीवर फलंदाजांनी पाणी फिरवले. आफ्रिकेला दुसऱ्या डावात २३५ धावा करता आल्या. डेव्हिड वेडिंगहॅमने ११० धावांची महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर किगन पीटरसन ( ४३) व कर्णधार नील ब्रँड ( ३४) हे सर्वाधिक धावा करणारे फलंदाज ठरले. २६७ धावांचा पाठलाग करताना टॉम लॅथम ( ३०) व डेवॉन कॉनवे ( १७) हे स्वस्तात माघारी परतले. पण, केन मैदानावर उभा राहिला आणि त्याने शतक झळकावले. त्याला विल यंगच्या अर्धशतकी खेळीची साथ मिळाली.

Image
केन विलियम्सनची विक्रमी कामगिरी

  • सर्वात कमी कसोटी इनिंग्जमध्ये ३२ शतकांचा विक्रम केनने नावावर केला आहे. त्याने १७२ इनिंग्जमध्ये हा पराक्रम करताना ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ ( १७४), रिकी पाँटिंग ( १७६) व भारताच्या सचिन तेंडुलकर ( १७९) यांचा विक्रम मोडला. 
  • कसोटीच्या चौथ्या डावातील केनचे हे पाचवे शतक ठरले आणि फॅब फोअर विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ व जो रूट यांना मिळून ४ शतकं झळकावता आली आहेत. 

Image

  • चौथ्या डावात सर्वाधिक ५ शतकांचा ( २६ इनिंग्ज) विक्रम केनच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने युनिस खान ( ५ शतकं, ४० इनिंग्ज) याच्याशी बरोबरी केली. सुनील गावस्कर ( ३३ इनिंग्ज) व रामनशेर सारवान ( ३६ इनिंग्ज) यांचा ४ शतकांचा विक्रम मोडला.
  • कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात १०००+ धावा करणारा तो पाचवा फलंदाज ठरला. जो रूट ( १५२०), दिमुथ करुणारत्ने ( ११०६), विराट कोहली ( १०५०) व बेन स्टोक्स ( १०१७)  हे आघाडीवर आहेत.  

Web Title: Kane Williamson registered Fastest to score 32 centuries in Tests (By Inns), break Sunil Gavaskar record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.