Big News : केन विलियम्सननं न्यूझीलंडचे कर्णधारपद सोडलं; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा निर्णय 

New Zealand tour of Pakistan : पाकिस्तान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केन विलियम्सनने ( Kane Williamson) न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपद सोडले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 09:27 AM2022-12-15T09:27:53+5:302022-12-15T09:28:07+5:30

whatsapp join usJoin us
Kane Williamson steps down as New Zealand Test captain, veteran bowler Tim Southee given keys to Black Caps' red-ball team, team announced for pakistan tour | Big News : केन विलियम्सननं न्यूझीलंडचे कर्णधारपद सोडलं; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा निर्णय 

Big News : केन विलियम्सननं न्यूझीलंडचे कर्णधारपद सोडलं; पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यापूर्वी मोठा निर्णय 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

New Zealand tour of Pakistan : पाकिस्तान दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केन विलियम्सनने ( Kane Williamson) न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपद सोडले आहे. न्यूझीलंड क्रिकेटने याची घोषणा केली आहे. केन विलियम्सनने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर आता संघाचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. मात्र, विलियम्सन वनडे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये संघाचा कर्णधार कायम असेल.

कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर विलियम्सन म्हणाला की, संघाचे नेतृत्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या निर्णयासाठी हीच योग्य वेळ असल्याचे आहे. मी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवले, हा माझ्यासाठी बहुमान होता. माझ्यासाठी कसोटी क्रिकेट हे सर्वोच्च श्रेणीचे आहे आणि मी कर्णधारपदाचे आव्हान स्वीकारले आहे. कर्णधार म्हणून तुमचे काम, कामाचा ताण वाढतो. माझ्या कारकिर्दीच्या या टप्प्यावर, मला वाटले की कसोटी कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ आहे.

साऊदीने एकूण ३४६ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २२ वेळा ट्वेंटी-२० मध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्याचवेळी, तो आता न्यूझीलंडचा ३१ वा कसोटी कर्णधार आहे, जो या महिन्यापासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान दौऱ्यापासून संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर टॉम लॅथमला संघाचा कसोटी कर्णधार बनवण्यात आले आहे. विलियम्सनच्या अनुपस्थितीत लॅथमने संघाचे नेतृत्व केले आहे. 
 

विलियम्सन पुढे म्हणाला की, मी टीम आणि टॉमला सपोर्ट करण्यास पूर्णपणे तयार आहे. मी माझ्या कारकिर्दीत दोघांसोबत खेळलो आहे. आणि दोघेही ही जबाबदारी चोखपणे पार पाडतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे. न्यूझीलंडकडून खेळणे आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये योगदान देणे हे माझे पहिले प्राधान्य आहे.
विलियम्सनने ३८ वेळा कसोटीत संघाची कमान सांभाळली आहे. यामध्ये त्याने २२ जिंकले आहेत, ८ ड्रॉ केले आहेत आणि १० हरले आहेत.  न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातली पहिली कसोटी २६ डिसेंबरपासून कराची येथे सुरू होईल, तर दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून मुलतानमध्ये सुरू होईल.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कसोटी संघ
टीम साऊदी (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, ईश सोधी, ब्लेअर टिकनर, नील वॅगनर, केन विलियम्ससन, विल यंग.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: Kane Williamson steps down as New Zealand Test captain, veteran bowler Tim Southee given keys to Black Caps' red-ball team, team announced for pakistan tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.