श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत न्यूझीलंडच्या संघावर लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की ओढावली. पहिल्या कसोटी सामन्यात कडवी टक्कर देणाऱ्या किवींवर दुसऱ्या सामन्यात १५४ धावांसह डावाने पराभूत होण्याची वेळ आली. ब्लॅक कॅप्सच्या ताफ्यातील स्टार फलंदाज केन विलियम्सन यालाही या सामन्यात आपली छाप सोडता आली नाही. पहिल्या डावात ७ धावांवर तंबूत परतलेला केन दुसऱ्या डावात अर्धशतकाच्या जवळ पोहचल्यावर अडखळला. ४६ धावांवर निराश पेरिस याने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या डावात त्याला मोठी खेळी करता आली नसली तरी फॅब फोर अर्थात मॉडर्न क्रिकेटच्या जमान्यातील आघाडीच्या ४ फलंदाजांच्या यादीत त्याने किंग कोहलीला मागे टाकले आहे.
केन विलियम्सन यानं किंग कोहलीला केलं ओव्हरटेक
श्रीलंकेविरुद्धच्या गाले क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात अर्धशतक अवघ्या ४ धावांनी हुकले असले तरी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत केन विलियम्सन भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहलीच्या पुढे निघून गेलाय. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो आता १९ व्या स्थानावर पोहचलाय.
किंग कोहली अन् केन यांच्यात काँटे की टक्कर
केन विलियम्सन याने आतापर्यंत खेळलेल्या १०२ कसोटी सामन्यातील १८० डावात ५४.४८ च्या सरासरीनं ८८८१ धावा केल्या आहेत. पण विराट कोहली त्याच्यापाठोपाठ २० व्या स्थानावर आहे. किंग कोहलीच्या खात्यात ८८७१ धावा आहेत. या दोघांच्यामध्ये अवघ्या काही धावांचा फरक आहे. त्यामुळेभारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत दोघांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळेल.
फॅबच्या यादीत किंग कोहली तळाला
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत १५९२१ धावा केल्या आहेत. ज्यावेळी फॅब -४ चा विचार केला जातो त्यावेळी या यादीत इंग्लंडचा जो रुट १२०२ धावांसह अव्वलस्थानावर असल्याचे दिसून येते. स्टीव्हन स्मिथ या यादीत ९६८५ धावांसह दुसऱ्या स्थानावर असून केन तिसऱ्या आणि किंग कोहली सर्वात तळाला असल्याचे दिसून येते. आधी कोहलीसमोर न्यूझीलंडच्या स्टारला मागे टाकण्याचे चॅलेंज असेल. सध्याच्या घडीला विराट खूप मागे असला तरी न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतून दमदार कमबॅकसह तो पुन्हा लयीत दिसला तर आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपर्यंत फॅब ४ मध्ये तो टॉप २ मध्ये सहज पोहचू शकतो. पण यासाठी