Join us  

केन विलियम्सनला विश्रांती, टीम साऊदीकडे किवी संघाचे नेतृत्व

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना श्रीलंका दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 10:51 AM

Open in App

कोलंबोः न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट यांना श्रीलंका दौऱ्यातील ट्वेंटी-20 मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. विलियम्सनच्या अनुपस्थितीत टीम साऊदी संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. यष्टिरक्षक टीम सेइफर्ट हा दुखापतीतून सावरला असून त्याचे पुनरागमन झाले आहे. शिवाय मिचेल सँटनर, टोड अॅस्टेल आणि इश सोधी या तीन फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे.

''केन आणि ट्रेंट यांनी वर्ल्ड कप स्पर्धेत संघासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आता आणखी आव्हानं आहेत, तत्पूर्वी त्यांना पुरेशी विश्रांती मिळण्याची आवश्यकता आहे,'' असे निवड समितीचे प्रमुखे गॅव्हीन लार्सेन यांनी सांगितले.  यष्टिरक्षक- फलंदाज सेइफर्ट याला प्लंकेट शिल्ड क्रिकेट स्पर्धेत बोटाला दुखापत झाली होती आणि त्यामुळे त्याला वर्ल्ड कप स्पर्धेलाही मुकावे लागले होते. टॉम ब्रुस हाही पुनरागमन करणार आहे. त्याने सुपर स्मॅश ट्वेंटी-20 स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली आहे. ब्रुसने 11 डावांत 353 धावा केल्या आहेत. 

किवींचा संघ - टीम साऊदी, टॉड अॅस्टल, टॉम ब्रुस, कॉलीन डी ग्रँडहोम, ल्युकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्तील, स्कॉट कुग्गेलेईंज, डॅरील मिचेल, कॉलीन मुन्रो, सेथ रँस, मिचेल सँटनर, टीम सेइफर्ट, इश सोधी, रॉस टेलर. 

टॅग्स :न्यूझीलंडश्रीलंका