Join us  

विराटने रणजी ट्रॉफीत खेळावे अथवा कुठेही धावा कराव्यात; पण..., कपिल देव यांचं मोठं वक्तव्य

इंग्लंड दौरा संपल्यानंतर, 'कोहली तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वेस्टइंडीजचा दौरा करणार नाही. कोहलीला संघातून बाहेर केले गेले, की आराम देण्यात आला आहे, असे विचारले असता कपिल म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 8:31 PM

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याने गेल्या नोव्हेंबर 2019 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक झळकावलेले नाही. त्याच्या कडून सर्वच फॉरमॅटमध्ये खराब कामगिरी होत आहे. 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांना वाटते, की सध्या कोहली फॉर्ममध्ये नाही, मात्र तो एक उत्कष्ट फलंदाज आहे. जर तो एकदा चांगलं खेळला तर, लवकरच फॉर्ममध्ये येऊ शकतो.

विराट कोहली संदर्भात कपील देव यांचे नवे वक्तव्य -भारतीय संघात गेल्या 5-6 वर्षांत विराट सोबतच राहिला आहे. त्याने सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून विराट संघात योगदान देण्यात अपयशी ठरत आहे. अशा खेळाडूनने परत फॉर्मात यावे आणि भारतीय संघासाठी आपले योगदान द्यावे, अशी माझी इच्छा आहे. त्याला पुन्हा फॉर्मात येण्यासाठी स्वतःच रस्ता शोधावा लागेल. विश्वचषक तोंडावर आला आहे. यामुळे तो फॉर्ममध्ये येणे अत्यंत आवश्यक आहे. 

कोहली फॉर्ममध्ये येणे आवश्यक -कपिल म्हणाले, 'विराटने रणजी ट्रॉफीत खेळावे अथवा कुठेही धावा कराव्यात. पण त्याने पुन्हा एकदा आत्मविश्वास मिळवणे आवश्यक आहे. हाच एक महान आणि चांगल्या खेळाडूमधील फरक आहे. त्याच्यासारख्या महान खेळाडूने फॉर्ममध्ये येण्यासाठी एवढा वेळ घ्यायला नको.

इंग्लंड दौरा संपल्यानंतर, 'कोहली तीन वनडे आणि पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी वेस्टइंडीजचा दौरा करणार नाही. कोहलीला संघातून बाहेर केले गेले, की आराम देण्यात आला आहे, असे विचारले असता कपिल म्हणाले, 'विराट कोहली सारख्या महान खेळाडूला बाहेर करण्यात यावे, असे मी म्हणू शकत नाही. जर आपण म्हणत असाल, की त्याला सन्मान देण्यासाठी आराम दिला आहे, तर यात काहीही वावगे नाही.'

टॅग्स :कपिल देवविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ
Open in App