कपिल देव बर्थडे स्पेशल: कपिल देव एकदाही झाले नाहीत रन आऊट, तुम्हाला माहिती आहे का...

कसोटी क्रिकेटमध्ये कपिल यांनी सर्वाधिक 434 बळी मिळवले होते. हा विश्वविक्रम त्यांच्या नावावर तब्बल 8 वर्षे होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 04:55 PM2019-01-06T16:55:10+5:302019-01-06T16:55:40+5:30

whatsapp join usJoin us
Kapil Dev Birthday: Kapil Dev does not get run out once, do you know ... | कपिल देव बर्थडे स्पेशल: कपिल देव एकदाही झाले नाहीत रन आऊट, तुम्हाला माहिती आहे का...

कपिल देव बर्थडे स्पेशल: कपिल देव एकदाही झाले नाहीत रन आऊट, तुम्हाला माहिती आहे का...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांचा आज 60वा वाढदिवस आहे. कपिल यांचा जन्म 6 जानेवारी 1959 साली झाला होता. कपिल हे आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना पाकिस्तानविरुद्ध खेळले होते. 16 ऑक्टोबर 178 साली हा सामना फैसलाबाद येथे खेळवण्यात आला होता.

कपिल देव यांचे पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे आहे. कपिल यांच्या नावावर सर्वाधिक बळी मिळवण्याचा विश्वविक्रम होता. कसोटी क्रिकेटमध्ये कपिल यांनी सर्वाधिक 434 बळी मिळवले होते. त्यांचा हा विश्वविक्रम वेस्ट इंडिजच्या कर्टली वॉल्शने मोडीत काढाला होता. पण हा विश्वविक्रम त्यांच्या नावावर तब्बल 8 वर्षे होता.

कपिल यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 184 डावांत फलंदाजी केली. पण या 184 डावांमध्ये ते कधीही रन आऊट झाले नाहीत. कपिल यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 साली विश्वचषकाला गवसणी घातली होती. या विश्वचषकात त्यांनी झिम्बाम्बेविरुद्ध साकारलेली 175 धावांची खेळी अजूनही चाहत्यांच्या स्मरणात आहे.







Web Title: Kapil Dev Birthday: Kapil Dev does not get run out once, do you know ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.