भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना रविवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. छातीत दुखू लागल्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री कपिल देव यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं. त्यांच्यावर मध्यरात्री १ वाजता अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. पण, त्यांना रविवारी डिस्चार्ज मिळाला.
कपिल देव यांनी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत १३१ कसोटी आणि २२५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर ५२४८ धावा आणि ४३४ बळींची नोंद आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कपिल यांनी ३७८३ धावा केल्या तसेच २५३ बळी घेतले. १९९४ मध्ये फरीदाबाद येथे वेस्ट इंडीज विरूद्ध त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.