Kapil Dev Kidnapped : या वर्षी भारतात एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. टीम इंडिया या विश्वचषकाच्या तयारीला लागली आहे करत आहे. यादरम्यान भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये कपिल देव यांना किडनॅप केल्याचे दिसत आहे. भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने हा व्हिडिओ शेअर केला असून चिंता व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये कपिल देव यांचे दोन्ही हात आणि तोंडावर कपड बांधून घेऊन जात असल्याचे दिसत आहे. गंभीरने ट्विटरवर पोस्ट केले, 'ही क्लिप इतर कोणाकडे आहे का? आशा आहे की, ते कपिल देव नाहीत आणि कपिल पाजी ठीक आहेत!' दरम्यान, या व्हिडिओवर अनेक नेटकरी कमेंट करत आहेत. अनेकजण ही जाहिरात असल्याचे म्हणत आहेत.
गौतम गंभीरच्या ट्विटनंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, अनेक तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. दरम्यान, 5 ऑक्टोबरपासून भारतात एकदिवसीय वर्ल्डकप सुरू होत आहे. भारताने यापूर्वी 1983 आणि 2011 मध्ये वर्ल्डकप जिंकला आहे. आता तिसऱ्यांदा चषक आपल्या नावावर करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरेल.