Join us  

रवी शास्त्री पुन्हा प्रशिक्षकपदी राहणार का? भारताचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार घेणार अंतिम निर्णय

वर्ल्ड कप स्पर्धेतील दावेदार भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक स्टाफचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता, परंतु आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत या सर्वांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 1:32 PM

Open in App

मुंबई : वर्ल्ड कप स्पर्धेतील दावेदार भारतीय संघाला उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह साहाय्यक स्टाफचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंतच होता, परंतु आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत या सर्वांना मुदतवाढ देण्यात आली आहे. पण, त्याचवेळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. 30 जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे आणि त्यानंतर प्रशिक्षक कोण असेल, याचा निर्णय घेतला जाणार आहे. पण, हा निर्णय भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार घेणार आहे. कोण आहे हा कर्णधार?

बीसीसीआयमध्ये मेगाभरती; मुख्य प्रशिक्षकासह महत्त्वाच्या पदांसाठी मागवले अर्ज

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीनं तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे आणि ही समिती मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. या समितीचे प्रमुख हे माजी कर्णधार कपिल देव असणार आहेत आणि त्यांच्यासह अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हेही या समितीचे सदस्य आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार रवी शास्त्री हे या पदावर कायम राहतील. त्यांच्याव्यतिरिक्त गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण आणि क्षेत्ररक्षक आर श्रीधर यांचेही पद कायम राहिल. प्रशासकीय समितीनं आधी नेमलेल्या सल्लागार समितीत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही व्ही एस लक्ष्मण यांचा समावेश होता, परंतु ही समिती बरखास्त करण्यात आली.  

रवी शास्त्रींची Exit? कोण असेल भारतीय संघाचा नवीन प्रशिक्षक? हे आहेत दावेदार!

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने ठेवल्या 'या' तीन अटी रवी शास्त्री हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत त्यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नव्या प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत आणि या पदासाठी बीसीसीआयनं तीन अटी ठेवल्या आहेत. 

- मुख्य प्रशिक्षकाकडे कसोटी खेळणाऱ्या संघाला दोन ते तीन वर्ष प्रशिक्षक करण्याचा अनुभव असावा. शिवाय त्याने 30 कसोटी किंवा 50 वन डे सामने खेळलेले असावेत-  फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने किमान 10 कसोटी किंवा 25 वन डे सामने खेळलेले असावेत - त्यांचे वय 60 वर्षांहून कमी असावेत

टॅग्स :वर्ल्ड कप 2019रवी शास्त्रीकपिल देव