'खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, पण ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात', कपिल देव यांनी टोचले कान

Kapil Dev on Team India: 'पैशासोबत अहंकार येतो. आजच्या काही खेळाडूंना वाटतं, त्यांनाच सगळं काही येतं..'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 03:26 PM2023-07-30T15:26:51+5:302023-07-30T15:28:30+5:30

whatsapp join usJoin us
Kapil Dev on Team India: ego comes With money; Kapil Dev slams current team india | 'खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, पण ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात', कपिल देव यांनी टोचले कान

'खेळाडूंमध्ये आत्मविश्वास, पण ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात', कपिल देव यांनी टोचले कान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Kapil Dev on Team India: भारताचे दिग्गज क्रिकेटर आणि 1983 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांनी सध्याच्या भारतीय क्रिकेट संघाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवरुन त्यांचे कान टोचले. कपिल देव यांनी सर्वप्रथम भारतीय खेळाडूंच्या आत्मविश्वासाचे कौतुक केले, मात्र त्यानंतर खेळाडू स्वत:ला सर्वज्ञानी समजतात, असेही म्हटले.

खेळाडू स्वतःला सर्वज्ञानी समजतात
कपिल देव 'द वीक'शी बातचीतमध्ये म्हणाले की, 'प्रत्येकामध्ये मतभेद असतात, परंतु या भारतीय खेळाडूंबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे, त्यांच्यात खूप आत्मविश्वास आहे. पण निगेटिव्ह पॉईंट असाही आहे की, ते स्वतःला सर्वज्ञानी समजतात. त्यांचात आत्मविश्वास खूप आहे. परंतु त्यांना असे वाटते की, आपल्याला कोणालाही काही विचारण्याची गरज नाही. पण, एखादा अनुभवी व्यक्ती तुम्हाला नेहमीच मदत करू शकतो.'

पैशांसोबत अहंकारही येतो
'पैशासोबत अहंकार येतो. असे काही खेळाडू आहेत, ज्यांचा अहंकार त्यांना सुनील गावसकरांसारख्या दिग्गजांचा सल्ला घेण्यापासून रोखतो. या क्रिकेटपटूंना वाटते की, त्यांनाच सर्व काही माहित आहे. असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांना खरच मदतीची गरज आहे. तुम्ही सुनील गावस्करांशी का बोलू शकत नाही? 50 सीझन क्रिकेट पाहणाऱ्या व्यक्तीकडून मदत घेतली पाहिजे. त्यांना थोड्या जास्त गोष्टी माहीत आहेत,' असे मत कपिल देव यांनी व्यक्त केले.

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत पराभव
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. यजमान विंडीजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाने केवळ 182 धावांचे लक्ष्य दिले होते, जे विंडीजने 80 चेंडू राखून पूर्ण केले आणि मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता वनडे मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 1 ऑगस्टला त्रिनिदादच्या ब्रायन लारा स्टेडियमवर खेळवला जाईल. 

Web Title: Kapil Dev on Team India: ego comes With money; Kapil Dev slams current team india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.