Join us  

IND vs ENG: जडेजाचे एका दगडात दोन पक्षी; अश्विन अन् कपिल देव यांच्या यादीत समावेश

IND vs ENG 3rd Test Live: आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 6:17 PM

Open in App

IND vs ENG 3rd Test Live Updates In Marathi | राजकोट: भारतीय कर्णधार रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि सर्फराज खान यांनी तिसऱ्या सामन्यातील पहिला दिवस गाजवला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर रोहितने शतकी खेळी करून डाव सावरला. त्याला जड्डूनेही चांगली साथ दिली अन् शतक झळकावून तो नाबाद परतला. हिटमॅनला बाद करण्यात मार्क वुडला यश आले. पण, त्यानंतर पदार्पणाचा सामना खेळत असलेल्या सर्फराज खानने छोटा पॅकेट बडा धमाका केला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसअखेर ८६ षटकांत ५ बाद ३२६ धावा केल्या. जडेजाने शतकी खेळीसह एका एलिट लिस्टमध्ये प्रवेश मिळवला आहे. 

खरं तर भारताकडून कसोटीमध्ये ३ हजारहून अधिक धावा आणि २०० हून अधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत जडेजा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत माजी कर्णधार कपिल देव यांचा पहिला नंबर लागतो. कपिल देव यांनी ५२४८ धावांसह ४३४ बळी घेतले आहेत, तर रवीचंद्रन अश्विन (३२७१ धावा, ४९९ बळी) दुसऱ्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजाने आज शतक झळकावून ३ हजार धावांचा टप्पा गाठला. जडेजाने ३००३ धावांसह २८० बळी घेण्याची किमया साधली. 

आज रोहितने १९६ चेंडूत १३१ धावांची शानदार खेळी केली. मार्क वुडने भारतीय कर्णधाराला बाद करून यजमान संघाला चौथा धक्का दिला. पण जडेजाने त्याचा अप्रतिम खेळ सुरूच ठेवला. जड्डूने देखील शतक झळकावून भारताला मजबूत स्थितीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. 

जडेजाने कसोटी कारकिर्दीतील चौथे शतक झळकावले, त्याला सर्फराज खानने चांगली साथ दिली. पदार्पणवीर सर्फराजने स्फोटक खेळी करताना अर्धशतक झळकावले पण जडेजाच्या एका चुकीमुळे सर्फराजला बाद व्हावे लागले. खरं तर झाले असे की जड्डू ९९ धावांवर खेळत असताना त्याने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून चूक झाली अन् सर्फराजला धावबाद व्हावे लागले. जडेजाने धाव घेण्याच्या इराद्याने दुसऱ्या टोकाला असलेल्या सर्फराजला कॉल दिला पण मार्क वुडने सर्फराजला धावबाद करण्यात कोणतीच चूक केली नाही. सर्फराजने १ षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने ६६ चेंडूत ६२ धावा केल्या. जडेजाने १९८ चेंडूत १०० धावांची शतकी खेळी केली.

तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, सर्फराज खान, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रजत पाटीदार, मोहम्मद सिराज. 

तिसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वूड व जेम्स अँडरसन.

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडरवींद्र जडेजाआर अश्विनकपिल देवभारतीय क्रिकेट संघ