नवी दिल्ली : भारताने जागतिक क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या ‘लॉर्ड्स’ मैदानावर १० जून १९८६ रोजी ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. १३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव अडखळल्यानंतर कर्णधार कपिलदेव यांनी तुफानी फटकेबाजी करीत भारताला पहिल्यांदाच लॉडर््सवर विजय मिळवून दिला होता. या शानदार विजयाला बुधवारी ३४ वर्षे पूर्ण झाली.
या सामन्यातील पहिल्या डावात ‘कर्नल’ दिलीप वेंगसरकर यांनी नाबाद १२६ धावांची खेळी करीत लॉडर््सवर सलग तीन शतकांची नोंद केली होती. असा पराक्रम करणारे ते जगातील एकमेव फलंदाज आहेत. मात्र त्यांची ही खेळी कपिलदेव यांच्या १० चेंडूंतील २३ धावांच्या खेळीपुढे झाकोळली गेली. (वृत्तसंस्था)
नाणेफेक जिंकून भारताने इंग्लंडला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. ग्रॅहम गूच (११४) आणि डेरेक प्रिंगल (६३) यांच्या शानदार खेळीनंतरही इंग्लंडचा डाव २९४ धावांत संपुष्टात आला. भारताकडून चेतन शर्माने ५ आणि रॉजर बिन्नीने ३ बळी घेतले. यानंतर वेंगसरकरचे शतक आणि मोहिंदर अमरनाथच्या (६९) अर्धशतकाच्या जोरावर भारताने ३४१ धावा करीत ४७ धावांची आघाडी घेतली होती.
दुसºया डावात पुन्हा इंग्लंडचा डाव कोलमडला आणि त्यांचा डाव १८० धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर भारताला १३४ धावांचे लक्ष्य मिळाले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ५ बाद १३६ धावा करीत बाजी मारली. यानंतर लीड्स येथे झालेला दुसरा कसोटी सामना भारताने २७९ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
Web Title: Kapil's six gave India victory over Lord's
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.