नवी दिल्ली - स्थानिक क्रिकेट सामन्यात रणमशीन असेल्या मयांक आग्रवालने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. सध्या सुरु असलेल्या रणजी चषकामध्ये मयांकनं हा कारनामा केला आहे. मयंकनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 705 धावा ठोकल्या ठोकल्या आहेत. एवढ्या धावा झळकावून मयंकनं सचिन तेंडुलकर, विराट कोहली, दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा यांना मागे टाकलं आहे. याचबरोबर मयंक कोणत्याही इंटर स्टेट ए लिस्ट स्पर्धेमध्ये 700 धावा करणारा पहिला खेळाडू बनला आहे.
सध्या सुरु असलेल्या विजय हजारे चषकाच्या अंतिम सामन्या मयांकनं 90 धावांची खेळी केली आहे. यादरम्यान त्यानं 11 चौकार आणि तीन षटकार लगावले. विजय हजारे चषकातील 8 सामन्यात तीन शतक आणि चार अर्धशतकासह 90.37 च्या सरासरीनं 723 धावा ठोकल्या. कोणत्याही टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम मयांकच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरनं 2003 वर्ल्ड कपमध्ये 673 धावा केल्या होत्या.
मयंकनं आत्तापर्यंत 37 प्रथम श्रेणी मॅचच्या 63 डावांत 51.17 च्या सरासरीनं 2917 धावा केल्या आहेत. मयंकनं 7 शतकं आणि 16 अर्धशतकं केली आहेत. रणजीमध्येही मयंकनं पाच शतकासह 105.6च्या सरासरीनं 1160 धावा केल्या आहेत. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेमध्ये मयंकनं 258 धावा केल्या.
पुढील महिन्यात होणाऱ्या तिरंगी मालिकेमध्ये युवा खेळाडूंना निवड समितीनं संधी दिली आहे. यामध्ये मयांकची निवड झाली नाही. त्यामुळं चाहत्यानी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.