कर्नाटकची उपांत्य फेरीत धडक, उपांत्यपूर्व फेरीत मुंबईवर एक डाव २० धावांनी मात

कर्नाटकने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रविवारी चौथ्या दिवशी मुंबईचा एक डाव २० धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:06 AM2017-12-11T01:06:36+5:302017-12-11T01:07:02+5:30

whatsapp join usJoin us
 Karnataka, in the semifinals, beat Mumbai by 20 runs in the quarter-finals | कर्नाटकची उपांत्य फेरीत धडक, उपांत्यपूर्व फेरीत मुंबईवर एक डाव २० धावांनी मात

कर्नाटकची उपांत्य फेरीत धडक, उपांत्यपूर्व फेरीत मुंबईवर एक डाव २० धावांनी मात

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्नाटकने रणजी ट्रॉफी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत रविवारी चौथ्या दिवशी मुंबईचा एक डाव २० धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.
मुंबईचा पहिला डाव १७३ धावांत गुंडाळणाºया कर्नाटक संघाने प्रत्युत्तरात ५७० धावांची मजल मारली आणि पहिल्या डावात ३९७ धावांची भक्कम आघाडी घेतली.
व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या या लढतीत रणजी स्पर्धेत ४१ वेळा जेतेपदाचा मान मिळवणाºया मुंबई संघाचा दुसरा डाव ११४.५ षटकांत ३७७ धावांत संपुष्टात आला. कर्नाटकने या पाचदिवसीय सामन्यात चौथ्या दिवशीच विजय साकारला.
मुंबईतर्फे दुसºया डावात सूर्यकुमार यादवने १८० चेंडूंना सामोरे जाताना १६ चौकार व १ षटकाराच्या मदतीने १०८ धावांची खेळी केली. आकाश पारकरने १८६ चेंडूंमध्ये ११ चौकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या आणि त्याने सूर्यकुमारसोबत चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. मुंबईने कालच्या ३ बाद १२० धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. सूर्यकुमार धावबाद झाल्यानंतर आकाशने सिद्धेश लाडसोबत पाचव्या विकेटसाठी ५२ धावा जोडल्या. आकाशला आॅफस्पिनर कृष्णप्पा गौतमने तंबूचा मार्ग दाखविला. पहिल्या डावात हॅट््ट्रिकसह सहा बळी घेणाºया कर्णधार विनयकुमारने त्यानंतर लाड (३१) व मुंबईचा कर्णधार आदित्य तारे (००) यांना बाद केले. गौतमने (६-१०४) मुंबईच्या डावाला पूर्णविराम दिला. पदार्पणाची लढत खेळणाºया शिवम दुबेने अखेर ९१ चेंडूंना सामोरे जाताना ७ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ७१ धावांची खेळी केली, पण संघाचा पराभव टाळण्यात त्याचे प्रयत्न अपुरेच पडले. (वृत्तसंस्था)

संक्षिप्त धावफलक

मुंबई पहिला डाव १७३. कर्नाटक पहिला डाव ५७०.
मुंबई दुसरा डाव ११४.५ षटकांत सर्वबाद ३७७ (सूर्यकुमार यादव १०८, आकाश परकार ६५,
शिवम दुबे ७१; के. गौतम ६-१०४, विनयकुमार २-४५, श्रीनाथ अरविंद १-४०).
 

Web Title:  Karnataka, in the semifinals, beat Mumbai by 20 runs in the quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.